शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या नावाने जमा पैसे प्रकरण : ‘ते’ एसएमएस शॉपिंग अ‍ॅपच्या पब्लिसिटीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 01:59 IST

तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये जमा केले असल्याचे लाखो एसएमएस काही दिवसांपासून लोकांना येत होते.

पुणे : तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये जमा केले असल्याचे लाखो एसएमएस काही दिवसांपासून लोकांना येत होते़ त्यामुळे आॅनलाईन फसवणुकीचा हा नवा प्रकार असल्याच्या संशयाने त्यावरील लिंक उघडून पाहू नका, असा इशारा देण्यात आला होता़ मात्र, हे एसएमएस एका शॉपिंग मोबाईल अ‍ॅपच्या प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आल्याचे पुणे सायबर क्राईम सेलने केलेल्या तपासात आढळून आले आहे़‘तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये पाठविल्याचे’ सांगून त्याखाली एक लिंक देण्यात आली आहे़ ती लिंक डाऊनलोड करा़ तसेच, एका कोड नंबर दिला होता़ हे एसएमएस राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते़ त्यामुळे हा आॅनलाईन शॉपिंगचा प्रकार असावा, असे वाटून ही लिंक ओपन करू नका, असे सांगणारे एसएमएस त्याबरोबर पाठविले जाऊ लागले होते़ त्याची तक्रार पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे करण्यात आली होती़ सायबर सेलने याची सखोल तपासणी केल्यावर हे बल्क एसएमएस उत्तर प्रदेशातील बीएसएनएलच्या पश्चिम विभागातून येत असल्याचे दिसून आले़ त्यानुसार बीएसएनएलकडून सायबर सेलने माहिती घेतल्यावर दिल्लीतील एका कंपनीने हे बल्क एसएमएस पाठविण्याची सुविधा घेतली असल्याचे आढळून आले़ सायबर सेलने या कंपनीशी संपर्क साधला़ त्यानंतर शनिवारपासून आता हे एसएमएस येणे बंद झाले आहे़दिल्लीच्या एका कंपनीने काढलेल्या नवी मोबाईल अ‍ॅपच्या प्रसिद्धीसाठी हे एसएमएस पाठविण्यात येत होते़ या कंपनीने हे काम दुसऱ्या एका कंपनीला दिले होते़ त्यांनी दिलेल्या प्रमाणापेक्षा किती तरी अधिक पटींनी हे एसएमएस पाठविण्यात आले; त्यामुळे संपूर्ण राज्यभर गोंधळ निर्माण झाला़या कंपनीकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपल्या नवीन मोबाईल शॉपिंग अ‍ॅपच्या प्रसिद्धीसाठी हे एसएमएस पाठविल्याचे सांगितले़ यावर कोणी संपर्क साधला, तर त्याने त्या अ‍ॅपवरून पुढील काळात काही खरेदी केली, तर त्याला त्याच्या बिलातही एक हजार रुपयांची रक्कम वळती केली जाणार होती़ मात्र, त्याचा सर्वांनी विपरीत अर्थ काढल्याने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा समज निर्माण झाला़या कंपनीच्या अधिकाºयांना आम्ही चौकशीसाठी बोलावले आहे़ ते सांगतात तसाच त्यांचा हेतू होता का, याबाबत अधिक तपास करीत आहोत़ त्याचा काही गैर हेतू होता का, याची पडताळणी केली जात आहे़ - जयराम पायगुडेपोलीस निरीक्षक, सायबर क्राईममित्राने तुमच्या खात्यात१ हजार रुपये जमा केले असल्याचे लाखो एसएमएस काही दिवसांपासून लोकांना सातत्याने येत होते़

टॅग्स :MobileमोबाइलMaharashtraमहाराष्ट्र