शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

सोमवारीही कुशावर्तावर स्रान

By admin | Updated: September 14, 2015 22:09 IST

त्र्यंबकेश्वर : देशभरातून आलेल्या भाविकांची अलोट गर्दी

त्र्यंबकेश्वर : पूर्वी श्रावण महिन्यात जास्त गर्दी झाली तर सिंहस्थ पर्वणीची अनुभूती आली असे संबोधले जायचे, आता मात्र यंदा सिंहस्थाच्या दुसऱ्या शाहीस्रानाला येथे भरणाऱ्या संत निवृत्तिनाथ यात्रेएवढी जेमतेम गर्दी होती. रविवारी साधारणत: पाच लाख भाविकांनी दुसऱ्या मुख्य पर्वणीचा लाभ घेतला. परंतु शाहीस्रानाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी येथे भाविकांनी अलोट गर्दी करून कुशावर्तावर स्रान केले. महाराष्ट्र शासनाने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २८०० कोटी, तर केंद्र शासनाने ५०० कोटी असे एकूण ३३०० कोटी रुपये खर्च केले. सिंहस्थासाठी त्र्यंबक नगरपालिकेला जवळपास ६० कोटींच्या आसपास निधी आला होता. अर्थात यातील बहुतेक निधी (कामांसाठीचा) जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीशिवाय खर्च होऊ शकला नाही. याव्यतिरिक्त प्रत्येक यंत्रणेसाठी मिळालेला निधी पाहता त्र्यंबकेश्वर व सर्व यंत्रणेमार्फत काही निधी खर्च झाला. नाशिकला भरपूर निधी मिळाला. तथापि झालेली गर्दी पाहता व येणारी एक सिंहस्थ पर्वणी मिळून झालेली गर्दी केवळ १० ते १२ लक्ष होईल. कदाचित त्यापेक्षा आकडा कमी होईल, मात्र सिंहस्थाचा प्रचार, प्रसार होण्यास महाराष्ट्र शासन कमी पडले. उलट त्र्यंबकेश्वर-नाशिकला होणारी गर्दी आणि त्यामुळे दोन्हीही ठिकाणे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे, असा प्रचार केल्याने देशभरातून भाविकांचा ओघ कमी झाला. तरीही आलेले भाविक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, राजस्थान, बंगाल, कर्नाटक राज्यातून आले होते.बंदोबस्त काहीसा शिथिल केला असला तरीही थोडीफार आगळीक काही अधिकारी आणि पोलिसांकडून झालीच. अनेकांना गचांड्या मारल्या तर काहीजण रांगेत असूनही त्यांना कुशावर्तावर जाताना झालेल्या गर्दीमुळे रांगेतून काढून देण्यात आले. हमारे भक्तों को कातारसे बाहर निकाला न जाय या साधूंच्या मागण्या पूर्ण करण्यास प्रशासनाने धन्यता मानली.तथापि, रांगेमधील भाविकांशी असे वागले असते तर पोलिसांना त्यांच्याकडूनही दुवा मिळाला असता. अनेक महिला रडत होत्या तर अनेकांना आपल्या नातेवाइकांना भेटू दिले नाही. त्र्यंबकला साधे वर्तमानपत्रांचे पार्सलदेखील आले नाही. मागच्या पर्वणीलादेखील वर्तमानपत्रांचे पार्सल असणारे वाहन शहरात येऊ दिले नाही अन्य सुविधा (भाजीपाला वगैरे) व्यवस्थित दिल्या. अनेक ठिकाणी अन्य कर्मचाऱ्यांकडून अरेरावी केली गेली, लोकांनी पादत्राणे काढली की, ती पादत्राणे त्वरित कचरा गाडीत टाकून बाजूला गोळा केली जायची. अनेक भाविकांनी चपला शोधण्याकडे दुर्लक्ष केले. कोणाला वेळच मिळाला नाही. एस.टी. बसगाड्यांची संख्या, खासगी वाहने, आखाड्यातील भक्त अशी संख्या चार लाखांच्या वर पोहोचली. एकंदरीत भाविक असे कमीच आले. डोक्यावर दहशतवादी हल्ल्याची अनामिक भीती घेऊन ! (वार्ताहर)