शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सहा खनिज खाणींविषयी सोमवारी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 21:35 IST

पणजी : राज्यातील सहा खनिज खाणींकडे असलेल्या  कनसेन्ट टू ऑपरेट दाखल्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी संबंधित खनिज कंपन्यांनी केली आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची येत्या सोमवारी बैठक होणार असून त्यावेळी सहा खनिज खाणींविषयी चर्चा होईल व योग्य तो निर्णयही होईल, असे सुत्रंनी सांगितले. या खनिज खाणी सध्या चालू स्थितीत आहेत.

ठळक मुद्देसंबंधित खनिज कंपन्यांनी 'कनसेन्ट टू ऑपरेट' दाखल्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली आहे

पणजी : राज्यातील सहा खनिज खाणींकडे असलेल्या  कनसेन्ट टू ऑपरेट दाखल्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी संबंधित खनिज कंपन्यांनी केली आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची येत्या सोमवारी बैठक होणार असून त्यावेळी सहा खनिज खाणींविषयी चर्चा होईल व योग्य तो निर्णयही होईल, असे सुत्रंनी सांगितले. या खनिज खाणी सध्या चालू स्थितीत आहेत. सहा खनिज खाण कंपन्यांनी मंडळाकडे अर्ज करून  कनसेन्ट टू ऑपरेट दाखल्याला मुदतवाढ द्यावी अशी विनंती केली आहे. दि. 31 डिसेंबरला मुदत संपुष्टात येते. 23 जून 2क्17 रोजी झालेल्या मंडळाच्या 125 व्या बैठकीवेळी सहा खनिज खाणींच्या  कनसेन्ट टू ऑपरेट  दाखल्याला मुदतवाढ द्यावी असे ठरले होते. मात्र त्यानंतर गोवा फाऊंडेशनची याचिका प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आली. सर्वोच्च न्यायालयाने दि. 2 ऑगस्ट 2क्17 रोजी ओरीसाप्रश्नी दिलेल्या निवाडय़ाचा संदर्भ गोवा फाऊंडेशनने दिला व कनसेन्ट टू ऑपरेट रद्द करावेत अशी मागणी केली. त्या निवाडय़ानुसार 1994 सालच्या अधिसूचनेनुसार मिळालेले पर्यावरणीय दाखले (ईडी) रद्दबातल ठरतात, असे गोवा फाऊंडेशनचे म्हणणो आहे. सहापैकी पाच खनिज खाणींना 1994 सालच्या अधिसूचनेनुसार ईसी मिळाली होती. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाचही खनिज खाण कंपन्यांना कारणो दाखवा नोटीस पाठवली व तुमचे कनसेन्ट टू ऑपरेट का रद्द केले जाऊ नयेत अशी विचारणा केली. त्या नोटीशीला कंपन्यांनी उत्तर दिले. त्या उत्तराबाबत मंडळाने तज्ज्ञांकडे कायदेशीर सल्ला मागितला होता. मंडळाकडे आता तो कायदेशीर सल्ला आलेला आहे. त्या सल्ल्याच्या आधारे सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीत चर्चा होईल व निर्णय घेतला जाणार आहे.गणोश शेटगावकर यांनी चार दिवसांपूर्वीच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून ताबा घेतला आहे. त्यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर सोमवारी होणारी बैठक ही पहिली बैठक आहे. मंडळाने यापूर्वी काही खनिज खाणींच्या परिसरातील पाण्याच्या दर्जाची तपासणी केली आहे. त्याबाबतचा अहवालही बैठकीसमोर मांडला जाईल. तसेच हवा प्रदूषण रोखण्यासाठी मंडळाने काही तत्काळ व काही दूरगामी उपाय सूचविले आहेत. ते उपाय देखील सोमवारच्या बैठकीसमोर मांडले जाणार आहेत, असे सुत्रंनी सांगितले. 1994 सालच्या ईसीबाबत व कनसेन्ट टू ऑपरेटविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकी कोणती भूमिका घेईल याकडे गोव्याचे लक्ष लागून आहे. 

टॅग्स :goaगोवाpollutionप्रदूषण