शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

स्मारकाचेही ‘राज’कारण !

By admin | Updated: November 18, 2015 04:25 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक दादरच्या शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख

बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यात -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणामहापौर बंगल्यात स्मारक नको - राज

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक दादरच्या शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी केली; मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महापौरांच्या बंगल्यात स्मारक उभारण्यास विरोध करून नियोजित स्मारकाला वादाची वीट लावली आहे. महापौरांचा बंगला बळकावण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे, ‘मातोश्री’वर स्मारक उभारा, अशी मागणी करत काँग्रेसने स्मारकारचे ‘राज’कारण आणखी चेतविले.बाळासाहेब ठाकरे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी पार्कातील स्मृती स्थळी मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पंकजा मुंडे, दिवाकर रावते, रामदास कदम, प्रकाश मेहता आदी मंत्र्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली. बाळासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे स्मारक त्यांना साजेसेच होईल. राज्याला दिशा देण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे निधीचा विचार केला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. स्मारकासाठी उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक ट्रस्ट उभारण्यात येईल. ट्रस्टवर शिवसेना, भाजपा नेत्यांची नियुक्ती लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या ट्रस्टचा खर्च राज्य शासन करणार आहे. बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती राज्य शासनाने नेमली होती. या समितीने आठ जागा सुचविल्या होत्या. त्यातून महापौर बंगल्यावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेतला, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आज लाखो शिवसैनिक आणि बाळासाहेब प्रेमींच्या भावनांचा आदर केला आहे. बाळासाहेबांचे विचार, त्यांनी मराठी माणसांसाठी केलेल्या संघर्षाच्या स्मृती हे स्मारक जपेल. त्याचे स्वरुप कसे असावे यासाठी सामान्य जनतेच्या सूचनाही मागविण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. रेसकोर्सच्या ठिकाणी भव्य उद्यान उभारण्याची आपली मागणी कायम असून त्या बाबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू; ते सहमत होतील, असा आपला विश्वास असल्याचे ठाकरे म्हणाले.वादानंतर पहिल्यांदाच एकत्रमुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे मध्यंतरीच्या कल्याण-डोंबिवली निवडणुकीतील कटुतेनंतर आज पहिल्यांदाच एकत्र आले. मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतले. महापौर बंगल्यात त्यांनी उद्धव यांच्यासोबत पत्रकारांशी संवाद साधला. ‘बाळासाहेब युतीचे शिल्पकार आणि प्रेरणा होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर, आपण दोघे भांडता तेव्हा ही पे्ररणा कुठे जाते? असा सवाल पत्रकारांनी केला असता मुख्यमंत्री म्हणाले की, बाळासाहेब, गोपीनाथ मुंडे हे युतीचे शिल्पकार आज नाहीत. पण युतीमध्ये वाद झाल्यावर ते कसे सोडवत याचा आम्हाला चांगला अभ्यास असल्याने आम्हीही ते सोडविण्यास सक्षम आहोत.महापौर बंगला पाडणार नाहीमहापौर बंगला हेरिटेजच्या यादीत असल्याने तो पाडला जाणार नाही. महापौरांच्या निवासाची व्यवस्था अधिक प्रशस्त जागेत केली जाईल. बंगल्याचा वापर स्मारकासाठी केला जाणार आहे. पुढील वर्षी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनापर्यंत स्मारकाची उभारणी सुरू झालेली असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘मातोश्री’वरच स्मारक उभाराएखाद्या नेत्याचे स्मारक उभारायचे असल्यास ते साधारणत: त्यांच्या निवासस्थानीच उभारले जाते. जगभरात हीच पद्धती आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे स्मारक ‘मातोश्री’च्या जागेवर ते होणे सयुक्तिक ठरेल. - राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते बाळासाहेब आणि वि.दा. सावरकर या दोन हिंदुहृदयसम्राटांची स्मारके आजूबाजूला होताहेत. समोर शिवसेनेचा जन्म झाला ते शिवाजी पार्क आहे. या बंगल्याला शिवसेनाप्रमुखांचा सहवासदेखील लाभला असल्याने स्मारकासाठी ही जागा सर्वांत योग्य आहे. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना मुंबईत शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, हॉटेल्स आणि अल्पसंख्याकांच्या संस्थांना हवी तिथे जागा मिळते. मग बाळासाहेबांच्या स्मारकाला का मिळू नये? महापौर बंगल्याचा हट्ट कशासाठी? स्मारक प्रशस्त हवे असेल तर दादरमधील म्युनिसिपालिटी क्लबची जागा ताब्यात घ्या.- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे