शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

मोहसिनला पकडले; चौकशीसाठी दिल्लीला जाणार एटीएस पथक

By admin | Updated: February 7, 2016 01:15 IST

अतिरेकी कारवायात सहभागी होण्यासाठी मालवणीतून गायब झालेल्या चार तरुणांपैकी एक असलेल्या मोहसिन शेखला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी मुंबई

- डिप्पी वांकाणी,  मुंबई अतिरेकी कारवायात सहभागी होण्यासाठी मालवणीतून गायब झालेल्या चार तरुणांपैकी एक असलेल्या मोहसिन शेखला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या एटीएसचे पथक दिल्लीला जाणार आहे. गायब झालेल्यांपैकी दोन तरुण परत आलेले आहेत. त्यांनी या प्रकरणाला मोहसिन शेखला जबाबदार ठरविले आहे. इसिससाठी तरुणांची भरती करणाऱ्या रिझवान याच्या संपर्कात मोहसिन होता. तर दिल्ली पोलिसांनी मोहसिनला उत्तराखंड मॉडल प्रकरणात अटक केलेली आहे. याबाबत आपल्याला मीडियातून कळाले आहे, असे मोहसिन शेखच्या वडीलांनी सांगितले. तर या अटकेमुळे आपण समाधानी असल्याचेही ते म्हणाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोहसिनची कोठडी मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करु. तथापि, त्याच्या चौकशीनंतरच या प्रकरणी तिघांच्या भविष्याचा फैसला होउ शकेल. मालवणी भागातून १५ डिसेंबर २०१५ रोजी तीन तरुण गायब झाले. वाजिद शेख, नूर मोहम्मद आणि मोहसिन शेख हे ते तिघे तरुण आहेत. दरम्यान, हे तिघे इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेले असल्याचे वृत्त झळकल्यानंतर वाजिद हा पुण्यात असल्याचे स्पष्ट झाले तर नूर मोहम्मद हा स्वत: हून परत आला. या दोघांनीही एटीएसला सांगितले की, गायब होण्याच्या या घटनाक्रमाला मोहसिन हाच जबाबदार आहे. अय्याझ सुल्तान गायब झाल्यामुळे त्याचे कुटुंबीय आम्हालाच जबाबदार ठरवित होते, असेही त्यांनी सांगितले. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मोहसिन शेखच्या चौकशीसाठी एक पथक आम्ही दिल्लीला पाठवित आहोत. त्याची चौकशी आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. ते तरुण आणि रिझवान यांच्यातील मोहसिन शेख एक महत्वाचा दुवा आहे. रिझवानवर इसिससाठी तरुणांची भरती करण्याची जबाबदारी होती. काही दिवसांपूर्वीच महत्वपूर्ण घडामोडीत एटीएसने नवाजुद्दीन उर्फ रिझवान याला उत्तर प्रदेशातून अटक केली होती. रिझवान हा मोहसिनला मुंबईत दोन वेळा भेटला होता आणि मालवणीतून तरुणांची भरती करण्याबाबत त्याने मोहसिनला सांगितले होते. रिझवानला डोंगरी बाल सुधारगृहात पाठवावे, अशी मागणी त्याच्या वकीलांनी केली आहे. त्याच्या वयाबाबतचे कागदपत्रे आम्ही एकत्र केली आहेत. त्यात मतदान ओळखपत्राचाही समावेश आहे. ते आम्ही न्यायालयात ११ फेब्रुवारीला दाखल करू, असेही त्यांनी सांगितले.