शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

Mohit Kamboj Car Attack: मोहित कंबोजच्या गाडीत अ‍ॅसिड होते?; विनायक राऊतांच्या आरोपांवर कंबोज संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 23:27 IST

Attack on Mohit Kamboj By Shivsena : मोहित कंबोज यांनी हल्ल्यानंतर एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी आपण गाडीतच होतो, असे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी या शिवसैनिकांवर कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे. 

भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या कारवर आज मातोश्रीबाहेर हल्ला झाला. या गाडीमध्ये अ‍ॅसिड होते. ते शिवसैनिकांवर टाकण्याचा कट कंबोज यांचा होता. मातोश्रीबाहेरील शिवसैनिकांना चिथावण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचा आरोप खासदार विनायक राऊतांनी केला आहे. यावर मोहित कंबोज यांनी उत्तर दिले आहे. 

माझ्यावर हल्ला झाला. पोलिसांचे मी आभार मानतो, परंतू त्यांनी कारवाई करावी. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे. मंत्री अस्लम शेख, प्रसाद लाड यांच्यासह आम्ही एका लग्नाला गेलो होतो. ते माझ्या मागे पुढेच होते. माझ्या गाडीत अ‍ॅसिड ठेवले हे विनायक राऊत सांगताहेत, ते त्यांनी ठेवले होते का? ते गाडीत बसले होते का? असा संतप्त सवाल कंबोज यांनी केला आहे. यावर कंबोज यांनी जावेद-सलीम जोडीमध्ये आणखी कोणाला घुसवू नका, असे ते म्हणाले. 

दरम्यान मोहित कंबोज यांनी हल्ल्यानंतर एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी आपण गाडीतच होतो, असे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी या शिवसैनिकांवर कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे. 

नेमके काय घडले...थोड्या वेळापूर्वी मातोश्री परिसरात भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर हल्ला झाला आहे. कंबोज यांची गाडी शिवसैनिकांनी पाहिली आणि तिकडे धाव घेतली. यावेळी कंबोज यांचे सुरक्षारक्षक आणि तिथे असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत कंबोज यांची सुरक्षा केली. यावेळी कंबोज यांना पुढे पाठवून देण्यात आले. . कंबोज रेकी करण्यासाठी आलेले असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.  

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत BJPभाजपाShiv Senaशिवसेना