शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मोहाच्या दारूची अस्वलांनाही नशा

By admin | Updated: December 22, 2016 17:31 IST

ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्यात असलेल्या गावालगतच्या जंगलात मोहाच्या झाडांच्या फुलांपासून गावठी दारू बनविण्यात येते

विवेक चांदूरकर/ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 22 - ज्ञानगंगा व अंबाबरवा  अभयारण्यात असलेल्या गावालगतच्या जंगलात मोहाच्या झाडांच्या फुलांपासून गावठी दारू बनविण्यात येते. ही मोहाची फुले खाण्याकरिता अस्वल गावामध्ये येत असून, यातूनच हल्ले होत असल्याचीशक्यता बीअर एक्स्पर्ट समितीच्या संशोधकांनी वर्तविली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्य आहे. या दोन्ही अभयारण्यात अस्वलांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या अभयारण्यात अनेक गावेही आहेत.या गावातील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून अभयारण्यात शेती करीत आहेत. मात्र, गत काही महिन्यांमध्ये अस्वलांचे हल्ले वाढले असून, चार महिन्यात चार जणांचा मृत्यू झाला तर दहा ते बारा जण जखमी झाले. डोंगर खंडाळा व डोंगर शेवली या गावांमध्ये अस्वलाने हल्ले करून तिघांना ठार केले. यासोबतच मोताळा तालुक्यात शेतांमध्ये अस्वलाचा वावर वाढला होता. पिलासह असलेल्या या अस्वलामुळे शेतकरी भयभीत झाले होते. याच भागात शेतातील झाडावर पाय अडकलेल्या अस्वलाला वनविभागाने ताब्यात घेवून जंगलात सोडले. जिल्ह्यात वर्षानुवर्षांपासून अस्वल व शेतकरी वास्तव्य करीत आहेत. आतापर्यंत अस्वलांच्या हल्ल्यांच्या घटना घटना घडल्या नाहीत. मात्र, अचानकच अस्वलांचे हल्ले का वाढले, याचा शोध घेण्यासाठी अस्वलांवर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीला पाचारण करण्यात आले आहे. या समितीने अभयारण्याची व हल्ले झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. गावांमध्ये काही नागरिक मोहाच्या फुलांपासून दारू बनवितात. तसेच गावालगतच्या शेतांमध्ये, झुडूपांमध्ये दारू बनविण्यात येते. यामध्ये वापरण्यात येणारे मोह हे अस्वलाचे प्रमुख खाद्य आहे. अस्वलाला दूरवरून या मोहाच्या फुलांचा गंध येतो. त्यामुळे अस्वल या मोहाच्या फुलाकडे आकर्षित होते व त्या ठिकाणाकडे धाव घेते. सदर दारूच्या भट्या या गावालगत असल्यामुळे अस्वली गावाकडे वळल्या असल्याचे मत   बीअर एक्स्पर्ट कमिटी नवी दिल्लीचे सहसंचालक डॉ. निशीथ धारिया यांनी व्यक्त केले आहे. अस्वल हा मुळ आक्रमक प्रवृत्तीचा प्राणी असून, प्रजनानाच्या काळात किंवा पिल्लांसह असलेली मादी अस्वल अधिकच आक्रमक असते. त्यामुळे मोहाच्या गंधाने गावाच्या वेशीत आलेल्या अस्वलाला माणूस निदर्शनास पडल्यावर हल्ला करीत असल्याचीही शक्यता असल्याचे मत डॉ. धारिया यांनी व्यक्त केले आहे.वनविभागाने केली तक्रारीअभयारण्यात असलेल्या गावांमध्ये तसेच गावालगतच्या भागात अनेक ठिकाणी दारूच्या भट्या असून, या भट्यांकडे अस्वल आकर्षित होते व परिणामी हल्ले वाढत असल्याची तक्रार वनविभागाने पोलिस विभागाकडे केली आहे.गावातील काही नागरिक दारू बनविण्याकरिता मोहाच्या फुलांचा वापर करीत आहेत. ही फुले अस्वलाचे मुख्य खाद्य आहे. या फुलांच्या गंधाने अस्वल गावाकडे वळते. यादरम्यान माणूस व अस्वलाचा सामना झाला तर हल्ले होण्याचीशक्यता आहे.- डॉ. निशीथ धारिया सहसंचालक, बीअर एक्स्पर्ट कमिटी नवी दिल्ली.