शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

विनाशाकडे घेऊन जाणारा मोदी पॅटर्न उखडून फेका- काँग्रेसची केंद्र सरकारवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 16:06 IST

नोटबंदी, जीएसटी, महागाई या तीन त्सुनामीच्या झळामुळे करोडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. सर्व सामान्यांचे जगणे मुश्कील होण्यास मोदी सरकारचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत आहे.

नांदेड :  नोटबंदी, जीएसटी, महागाई या तीन त्सुनामीच्या झळामुळे करोडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. सर्व सामान्यांचे जगणे मुश्कील होण्यास मोदी सरकारचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत आहे. हे दांभिक सरकार भारताला वेदपूर्वकाळात घेऊन जात आहे. आता अच्छे दिन येणार नाहीत, सरकार केवळ प्रतिमेचे खेळ करीत आहे. त्यामुळे उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या स्वप्नमयी दुनियेतून बाहेर पडत मोदी पॅटर्नला उखडून फेका, असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले.नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या ‘विचारातून विकासाकडे’ या कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन सोमवारी झाले.  कार्यक्रमाला माजी खा. भालचंद्र मुणगेकर, नियोजन समितीचे माजी सदस्य रत्नाकर महाजन, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. भाई जगताप, आ. अमिता चव्हाण, आ. डी. पी. सावंत, आ. वसंत चव्हाण, महापौर शैलजा स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण होते. रत्नाकर महाजन म्हणाले की, सध्या देश एका भयंकर यातनेतून जात आहे. चांगले दिवस येणार असे स्वप्न दाखवून केवळ मुठभरांसाठी काम करणा-या भाजपाने देशातील कष्टकरी, वंचित समाजाचे जगणे मुश्कील केले आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था खड्ड्यात जाणार हे जगभरातील तज्ज्ञ सांगत होते.  मात्र त्यानंतरही अट्टाहास करीत  देशाला अनेक वर्ष मागे लोटण्याचे पाप भाजपने केल्याचे ते म्हणाले. गोष्ट छोटी असते पण त्याचेच पुढे नखुरडे होते.  या देशाला विनाशापासून वाचविण्यासाठी आता भाजपाला रोखा, असे आवाहनही महाजन यांनी केले. भालचंद्र मुणगेकर म्हणाले, १७ वर्षापासून नांदेड मनपात काँग्रेस आहे. यावेळीही निर्विवाद सत्ता मिळणार त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या अ‍ॅडव्हान्स अभिनंदनासाठी आल्याचे सांगत त्यांनीही भाजपा सरकारच्या कारभारावर खरमरीत टीका केली. देशातील जनतेने तब्बल २७ वर्षानंतर पूर्ण बहुमताने एका पक्षाच्या हाती सत्ता दिली होती. खरे तर सरकारने या संधीचं सोन करायला हव होतं.  मात्र त्या ऐवजी देशाची वाटचाल विनाशाकडे सुरू झाली. जनता आज अच्छे दिन नकोत आम्हाला, आम्हाला आमचे पुर्वीचे दिवस परत करा, असे म्हणत आहे.  नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एकप्रकारे सरकारने  कायदेशीर व संघटीतपणे जनतेची केलेली लुट असल्याचे टिकाही मुणगेकर यांनी केली़ या नोटाबंदीमुळे देशातील ४१ लाख लोकांचा पोटापाण्याचा रोजगार गेल्याची माहितीही त्यांनी दिली़ जीएसटीची सुरुवात काँग्रेसनेच केली़ एक वस्तू एक भाव असे ते सूत्र आहे़ मात्र तेंव्हा विरोधात असलेल्या भाजपाने सलग सात वर्षे याला विरोध केला़  आणि सत्तेत आल्यानंतर मात्र कुठलेही नियोजन न करता जीएसटी लागू करीत या उपक्रमाचेही मातेरे केले़ कालपरवा यशवंत सिन्हांनी सरकारच्या या सर्व फसलेल्या आर्थिक नियोजनावर टिका केल्यानंतर त्यांच्याच मुलाला सिन्हा विरोधात लिहायला सांगितले़ सरकार सत्तेसाठी कुठल्या थराला जाते याचा प्रत्यय त्यांनी या घटनेद्वारे आणून दिला़ राज्यघटनेचा पाया असलेल्या मुलभूत कलमांना कुठल्याही सरकारला हात लावता येत नाही़ त्यामुळेच राज्यघटनेला हात न लावता वेगवेगळ्या माध्यमातून घटना प्रभावहीन करण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत़ राजस्थान सरकारने निवडणुकीत उभे राहण्यासाठी घातलेली शैक्षणिक पात्रतेची अट हे त्याचेच उदाहरण़ या अटीमुळे देशातील दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक, वंचित घटकाला  निवडणुकीपासून बाजूला फेकण्याचे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नांदेड मनपा निवडणुकीकेडे २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून पहा असा सल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला. या सरकारच्या कारभाराचा समाजातील एकाही घटकाला फायदा झाला नाही़ त्यामुळेच जनतेचा रोष वाढतो आहे. त्याचेच प्रतिबिंब सोशल मिडीयात उमटताना दिसत असून  २०१९ मध्ये भाजपचे सरकार नसेल याचे संकेत मिळत आहेत़ कालपर्यंत भाजपा आमची राजकीय विंग असल्याचे सांगणारा राष्ट्रीय स्वंयमसेवक संघाने काल दसरा पुजनावेळी भाजपाचा उच्चारही केला नसल्याचे ते म्हणाले़  प्रास्ताविक आ़ अमरनाथ राजूरकर यांनी तर शेवटी आभार उपमहापौर शफी अहेमद कुरेशी यांनी मानले.

राजकारणात वैचारिक मतभेदअसतात ते असलेच पाहिजेत. परंतु आज केवळ विरोधांकडे द्वेष, मत्सर, खुनशीपण दिसतोय़ स्वच्छता अभियान राबविताय चांगले आहे़ परंतू रस्त्यावरची घाण साफ करण्या अगोदर मनातील वैचारिक घाण काढून टाका अशी टिका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली़ पंतप्रधान मोदीनी नांदेडमध्येच पहिली सभा घेतली होती़ त्यावेळी नांदेडकरांनी मला ८० हजाराच्या मताधिक्याने निवडून दिले. कारण नांदेडकरांसोबतचे माझे नाते विश्वासाचे आहे. या महानगरपालिका निवडणुकीत ते अधिक मजबूत करू, असे विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस