शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी’ लाटेत २०१४ मध्ये तगले सात अपक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 02:12 IST

यंदा संख्या घटण्याची चिन्हे; मतदारांचे पक्षाच्या उमेदवारांना प्राधान्य असल्याची स्थिती

- धनंजय वाखारेनाशिक : एकेकाळी अपक्षांची मदत घेतली जाऊन सरकारे चालविली जायची. २00९च्या निवडणुकीत तब्बल २४ अपक्ष उमेदवार निवडून गेले होते. मात्र, २0१४च्या निवडणुकीत मोदी लाटेपुढे अपक्षांनाही लोटांगण घालावे लागले आणि अवघे ७ अपक्ष तग धरू शकले.२00९ च्या निवडणुकीत ७0 लाखांहूून अधिक मते घेणाऱ्या अपक्षांनी २0१४ च्या निवडणुकीत २४ लाख ९३ हजार मते मिळविली. गेल्या तीन निवडणुकांचा धांडोळा घेता, २00४ च्या निवडणुकीत १,0८३ उमेदवार अपक्ष म्हणून सामोरे गेले. त्यातील १९ उमेदवारांना विधानसभेत पाऊल ठेवता आले, तर १00२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. या निवडणुकीत अपक्षांनी ५८ लाख ७७ हजार ४५४ मते घेतली. त्यांच्या मतांची टक्केवारी १४.0५ टक्के इतकी होती. २00९च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ती १,८२0 इतकी झाली. त्यातील तब्बल २४ उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली, तर १७४७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यावेळी अपक्षांनी तब्बल ७0 लाख २३ हजार ८१७ मते घेतली. मतांची टक्केवारी होती १५.५0 टक्के, तर आता सत्ताधारी असलेल्या भाजपची टक्केवारी होती १४.0२ टक्के. २0१४ च्या निवडणुकीत मात्र मोदी लाटेत कॉँग्रेस-राष्टÑवादीसह मनसे आदी प्रमुख राजकीय पक्षांची दारुण अवस्था बनली असताना अपक्षांनाही ‘जोर का झटका’ लागला. या निवडणुकीत १६९९ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. त्यात अवघे ७ अपक्ष निवडून आले. २00९ च्या निवडणुकीत ७0 लाखांहून अधिक मते घेणाºया अपक्षांना २0१४च्या निवडणुकीत २४ लाख ९३ हजार १५२ मते मिळाली. मतांच्या टक्केवारीत मोठी घसरण होऊन ती ४.७१ टक्क्यांवर आली. मोदी लाटेत अपक्षही भुईसपाट झाले. जे तगले त्यातील काहींनी सत्तेसोबत राहण्यास पसंती दिली. आता राज्यभर होत असलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात युतीला कौल दिला जात असताना आणि त्यातही विरोधकांतून होणारी महागळती पाहता प्रमुख विरोधी पक्षांना सक्षम उमेदवार देताना घाम गाळावा लागताना दिसून येत आहे.अपक्षांचे महत्त्व झाले कमीशिवसेना-भाजप सरकारच्या काळात सात अपक्ष आमदार होते. त्यात अमळनेरमधून शिरीष चौधरी, बडनेरातून रवि राणा, अचलपूरचे बच्चू कडू, पाथरीचे मोहन फड, कल्याण पूर्वचे गणपत गायकवाड, भोसरीचे महेश लांडगे आणि अहमदपूरचे विनायकराव जाधव-पाटील यांचा समावेश होता. गेल्या तीन निवडणुकांवर दृष्टिक्षेप टाकला तर अचलपूरमधून सलग तीनवेळा अपक्ष म्हणून निवडून येण्याचा विक्रम प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी केलेला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी