शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला सर्वाधिक निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 05:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे सामान्य आणि गरिबांसाठी काम करणारे सरकार आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकारने चार वर्षांत प्रचंड मोठे विकासकार्य केले असून...

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे सामान्य आणि गरिबांसाठी काम करणारे सरकार आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकारने चार वर्षांत प्रचंड मोठे विकासकार्य केले असून त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला सर्वाधिक निधी मिळाल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार व प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मोदी सरकारची चार वर्षे ही संपूर्ण देशाच्या प्रगतीची वर्षे आहेत. सरकारने सामान्य माणसासाठी काम केले असून वेगवेगळ्या योजनांचा कोट्यवधी लोकांना लाभ झाला आहे. दरवर्षी आपले प्रगतिपुस्तक जनतेसमोर मांडणारे पारदर्शी सरकार देशात आहे. विरोधकही मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाहीत, असे सांगतानाच मोदी सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यात दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आठ हजार कोटींचा निधी दिला. इतका निधी यापूर्वी कधीच मिळाला नव्हता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचाही राज्यातील शेतकºयांना मोठा लाभ झाला. बीड, जालनासारख्या एका एका जिल्ह्याला यातून ८०० कोटी मिळाले. केंद्र सरकारने राज्यातील शेतकºयांसाठी शीतगृहे, अन्न प्रक्रिया प्रकल्पही मोठ्या प्रमाणावर मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यातील सिंचनाचे अर्धवट पडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचन सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने ३६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यात आतापर्यंतचे महामार्गांचे सर्वाधिक काम सुरू झाले आहे, असेही ते म्हणाले.महाराष्ट्राला केंद्राकडून प्रचंड मोठे पाठबळ लाभले आहे. आर्थिक विकास, गरिबांचे कल्याण, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उंचावणे, भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी सरकार देणे अशा अनेक बाबतीत मोदी सरकारने प्रभावी कामगिरी केली आहे, असे त्यांनी सांगितले.रेल्वेसाठी मोठा निधीत्यांनी सांगितले की, अनेक दशके रेंगाळलेले महाराष्ट्राचे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यास केंद्र सरकारने मदत केली आहे. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि आताचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रचंड निधी मंजूर केला आहे. मुंबईची रेल्वे सेवा सुधारण्यासाठी एकाच अर्थसंकल्पात ४० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. अर्थसंकल्पात एकाच शहरासाठी इतका निधी देण्यात आला ही अभूतपूर्व घटना असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी