शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 12:59 IST

२० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाइल फोन वापरण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाइल फोन वापरण्यास मनाई करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली.

२० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाइल फोन वापरण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. या निर्णयाला व्यवसायाने वकील उजाला यादव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. 

मुख्य न्या.देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या.अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. तसेही  निवडणूक प्रक्रिया पार पाडणे, हे जिकरीचे काम आहे आणि त्यात तुम्ही डिजिलॉकरमधील कागदपत्रे दाखविण्यास परवानगी देण्याची मागणी करत आहात. फोनद्वारे डिजिटल लॉकरमधील कागदपत्रे दाखविण्याचा अधिकर नागरिकांना नाही. निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदा नाही, असे खंडपीठाने याचिका फेटाळताना म्हटले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MumbaiमुंबईElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगHigh Courtउच्च न्यायालय