शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेसोबत, भाजपाच्या महापौरपदाच्या दाव्याला सुरुंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 19:05 IST

महापालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाने शिवसेनेना धूळ चारून विजय मिळवल्यानंतर भाजपाच्या महापौरपदाच्या दाव्याला बळ मिळालं आहे.

मुंबई- महापालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाने शिवसेनेना धूळ चारून विजय मिळवल्यानंतर भाजपाच्या महापौरपदाच्या दाव्याला बळ मिळालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मनसेच्या 6 नगरसेवकांना फोडून पक्षप्रवेश दिला आहे. मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्तांना त्याबाबत पत्रसुद्धा दिलं आहे.  विशेष म्हणजे राज ठाकरेंना विचारत न घेता मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे महापालिकेतील शिवसेनेचं संख्याबळ वाढलं आहे. भाजपासाठी हा मोठा धक्का समजला जातोय. शिवसेनेच्या या मास्टर स्ट्रोकमुळे भाजपासोबत मनसेलाही धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवक विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

शिवसेनेचे सध्या महापालिकेत 84 नगरसेवक आहेत, तर भाजपाजवळ 83 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. भांडुप पोटनिवडणुकीमुळे भाजपा नगरसेवकांच्या संख्येत एका अंकानं वाढ झाली होती. मात्र आता शिवसेनेकडे 91 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेना नगरसेवक फोडत असल्याचं सांगत निवडणूक आयोगाला पत्रसुद्धा दिलं आहे. 

तत्पूर्वी मनसेचे 5 ते 6 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती, शिवसेना मनसेच्या नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांकडे घेऊन जाण्याच्या तयारीत आहे, मनसेनेही आमचे केवळ एकाच नगरसेवकाशी संपर्क झाल्याचे म्हटले होते. भाजपापाठोपाठ मनसेनंही कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठवलं आहे.2017च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना व भाजपात दोन संख्याबळाचा फरक असल्याने शिवसेनेचे टेन्शन वाढले होते. त्यात भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाच्या विजयामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली. मनसेचे काही नगरसेवक निवडणुकीपूर्वीच भाजपात गेले होते. तर काही शिवसेनेच्या संपर्कात होते. बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महापालिकेत आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले होते. तेव्हापासून मनसेचे गटनेते दिलीप लांडे आणि आणखी एक नगरसेवक वगळता पाच जण गैरहजर होते. मनसेच्या हर्षला मोरे, अश्विनी माटेकर, अर्चना भालेराव, दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, परमेश्वर कदम या नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी सेना प्रवेश केला आहे. पक्षाच्या आदेशाविना नगरसेवकांनी निर्णय घेतला असून, एक दिवस मनसे सोडून गेलेल्या नगरसेवकांना नक्कीच पश्चात्ताप होईल, असंही मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. 

गटनोंदणी करण्याआधी पक्षाशी चर्चा करा, असा आदेश मनसेनं वेगळा गट स्थापन करण्यासाठी निघालेल्या नगरसेवकांना दिला होता. परंतु मनसेच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीसाठी संमती पत्र दिल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. 

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाMNSमनसे