शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

मनसेची नवी टॅगलाईन! राज ठाकरेंच्या भाषणाचा पहिला टीझर प्रसिद्ध, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 13:50 IST

येत्या २७ नोव्हेंबरला गोरेगावच्या नेस्को इथं मुंबईतील गटाध्यक्ष मेळावा घेत आहेत.

मुंबई - येत्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कुठल्याही क्षणी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद, पुणे महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यासाठी राजकीय पक्षांच्या बैठका, मेळावे सुरू झाले आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या काही दिवसांपासून बैठकांची मालिका सुरू ठेवली आहे. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं मुंबईत पहिलं भाषण होत आहे. 

येत्या २७ नोव्हेंबरला गोरेगावच्या नेस्को इथं मुंबईतील गटाध्यक्ष मेळावा घेत आहेत. दुपारी ४ वाजता याठिकाणी मनसे कार्यकर्ते जमतील. या गटाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीवर भाष्य करत मनसेच्या ट्विटर हँडलवरून या मेळाव्याचा पहिला टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर घसरला आहे अशी जनभावना आहे असं कॅप्शन देण्यात आले आहे. त्यानंतर चला, हे चित्र बदलूया आपण महाराष्ट्राला पर्याय देऊ या अशी साद घालण्यात आली आहे. या टीझरमध्ये "चला, पुन्हा नव्याने स्वप्न नवे पाहूया, नवमहाराष्ट्र घडवूया" अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. 

राज ठाकरे कोल्हापूरमार्गे कोकण दौऱ्यावर मनसे गटाध्यक्ष मेळाव्यानंतर राज ठाकरे हे २९ नोव्हेंबरला कोल्हापूरमार्गे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. २९-३० रोजी राज ठाकरे कोल्हापूरात अंबाबाईचं दर्शन घेत पदाधिकारी बैठक घेणार आहेत. त्यानंतर १ तारखेला कुडाळमध्ये सावंतवाडी, दोडा मार्ग येथे पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. मुक्कामाला मालवण येथे जाणार असून २ डिसेंबरला आंगणेवाडी येथे भराडीदेवीचे दर्शन घेणार आहे. त्यानंतर कणकवलीत मान्यवरांच्या भेटीगाठी घेत पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. तिथून पुढचा मुक्काम रत्नागिरीत असेल. राजापूर येथे ते मनसे कार्यालयाचं उद्धाटन करतील. इथं २०० महिला कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. लांजा येथील तालुका पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत ते रत्नागिरीत विविध ठिकाणी पक्ष कार्यालयाचं उद्धाटन करणार आहेत. 

५ डिसेंबरला राज ठाकरेंनी गुहागर तालुका कार्यालयाचं उद्धाटन करत चिपळूण येथे विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक लावली आहे. त्यानंतर खेड तालुका पदाधिकारी बैठक, दापोली-मंडणगड पदाधिकारी बैठक असा राज ठाकरेंचा दौरा नियोजित करण्यात आला आहे. नुकतेच मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी कोकण दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी तरुणांशी संवाद साधला. त्याचसोबत भाजपा आमदार नितेश राणे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता स्वत: मनसे प्रमुख राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहचला आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे