शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे ठरले, आता पुढील लक्ष्य बारामती! राज ठाकरे लवकरच घेणार मेळावा; पदाधिकारी कामाला लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 11:47 IST

MNS Raj Thackeray: राज ठाकरेंनी विश्वासू माणसावर बारामतीची जबाबदारी सोपवली असल्याचे सांगितले जात असून, लवकरच मनसेचा मोठा मेळावा होणार आहे.

MNS Raj Thackeray: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष बांधणीवर भर देताना पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राजपुत्र अमित ठाकरे राज्यातील विविध ठिकाणी दौरे करताना दिसत आहेत. आता मात्र मनसेचे पुढे लक्ष्य बारामती असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे लवकरच बारातमी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याची माहिती देण्यात आली असून, यासाठी पदाधिकारी कामाला लागले आहेत. 

बारामती हा पवारांचा गड मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. यानंतर आता बारामतीवासीयांचा कल कोणाकडे असेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आताच्या घडीला मनसेच नाही तर बारामतीकडे राज्यातील प्रमुख नेत्याचे लक्ष असल्याचे दिसत आहे. भाजपचे अनेक वरिष्ठ नेते बारामतीत दौरे करत आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी मध्यंतरी बारामतीत दौरा केला होता. त्यांच्यासोबतच बाकी नेतेही बारामतीत काबीज करायच्या तयारीत आहे. मात्र, राज ठाकरेंनी तगड्या माणसाकडे बारामतीची जबाबदारी सोपवली आहे. नाराजीवरून सातत्याने चर्चेत असलेल्या पुण्याचे वसंत मोरे यांच्या खांद्यावर बारामतीची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

बारामती शहरात राज ठाकरे लवकरच कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेणार

राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे मनसेने आता बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे बारामती लोकसभा प्रमुख वसंत मोरे बारामती दौऱ्यावरती आले होते. कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती शहरात राज ठाकरे लवकरच कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेणार असल्याची माहिती मोरे यांनी पत्रकारांना दिली. बारामती मतदारसंघातील तालुक्यात दौरा सुरू असून, पक्षातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. वसंत मोरे यांनी निवडणुका लढणे यावर बोलणे टाळले. लवकरच राज ठाकरेंचा बारामती शहरात कार्यकर्ता मोठा मेळावा होणार आहे. त्यासाठीच बारामतीत आलो आहे, असे वसंते मोरे यांनी सांगितले. 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नाराज होते. वसंत मोरे मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा  होती. मनसे सोडणार नाही, असे वसंत मोरे यांनी अनेकदा बोलून दाखवले. मनसेकडून पुणे जिल्हातील गावागावात पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. त्याची जबाबदारी वसंत मोरे यांना देण्यात आली आहे. ते सध्या बारामतीकडे जास्त लक्ष देत आहे. या मतदारसंघात मनसे वाढवण्याच्या तयारी दिसत आहे. त्यामुळे वसंत मोरे बारामती दौरा करत आहेत. 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीMNSमनसे