शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray : राज ठाकरेंनी मानले 'मनसे' आभार, म्हणाले, वाढदिवसाचे सोहळे असेच साजरे व्हायला हवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 11:14 IST

MNS Raj Thackeray : राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काल वाढदिवस अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवशी राज्यभरातून कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. प्रत्येकाला भेटता यावं याकरता राज ठाकरेंनी देखील खास वेळ बाजुला काढून ठेवला होता. पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवतीर्थावर भेटण्यासाठी आले होते. यानंतर आता राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. 

"माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी झालेली नजरभेट सुद्धा खूप उत्साह आणि आनंद देणारी होती. वाढदिवस हा सोहळा न होता तो लोकोपयोगी व्हावा ह्या उद्देशाने वाढदिवसाला भेटवस्तू आणि मिठाईच्या ऐवजी शालेय साहित्य आणि रोपं आणा असं सुचवलं होतं, ज्याला महाराष्ट्र सैनिकांनी उत्तम प्रतिसाद दिला, ह्याबद्दल धन्यवाद" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 

"सस्नेह जय महाराष्ट्र, काल वाढदिवसाच्या दिवशी हजारोंच्या संख्येने माझे महाराष्ट्र सैनिक, मला भेटायला, शुभेच्छा द्यायला शिवतीर्थावर आले. प्रत्येकाशी बोलण्याची इच्छा असली तरी ते शक्य नव्हतं, पण प्रत्येकाशी नजरानजर तरी झाली. माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी झालेली नजरभेट सुद्धा खूप उत्साह आणि आनंद देणारी होती. ह्याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन, एसएमएस, आणि समाजमाध्यमांतून शब्दशः शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता, ह्या सगळ्या शुभेच्छांसाठी मी अत्यंत ऋणी आहे. विशेषतः ट्विटरवर अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या, त्या माझ्यापर्यंत पोहचल्या आणि मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. वाढदिवस हा सोहळा न होता तो लोकोपयोगी व्हावा ह्या उद्देशाने वाढदिवसाला भेटवस्तू आणि मिठाईच्या ऐवजी शालेय साहित्य आणि रोपं आणा असं सुचवलं होतं, ज्याला महाराष्ट्र सैनिकांनी उत्तम प्रतिसाद दिला, ह्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाचे सोहळे हे असेच साजरे व्हायला हवेत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद." असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे