शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणिता पवारवर उपासमारीची वेळ; राज ठाकरेंनी साधला फोनवरून संवाद, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 15:07 IST

प्रणिता पवार हिचे वडील रिक्षा चालवून मुलीच्या खर्चासह घरप्रपंच चालवत होते. मात्र दीड वर्षापुर्वी कोरोनानं त्यांचं निधन झालं

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापुर तालुक्यात रामतीर्थ तांडा येथील प्रणिता मोहन पवार हिने २०१७ साली श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावलं होतं. कराटे स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूला हरवून तिन भारताचं नाव जगभरात केले. मात्र आज याच आंतरराष्ट्रीय खेळाडूवर उपासमारीची वेळ आली आहे.

प्रणिता पवार हिचे वडील रिक्षा चालवून मुलीच्या खर्चासह घरप्रपंच चालवत होते. मात्र दीड वर्षापुर्वी कोरोनानं त्यांचं निधन झालं. यामुळे प्रणिताच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आई रोजगार करून कसबसं घर भागवत आहे. प्रणिताच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. ही माहिती मनसे जिल्हाप्रमुख प्रशांत नवगिरे यांना समजताच त्यांनी या पवार कुटुंबीयांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना या प्रकरणी माहिती देताच त्यांनी प्रणिता पवार हिच्याशी फोनवरून संवाद साधत तिला धीर दिला.  

मनसेनं प्रणिता पवार  कुटूंबीयांची भेट घेऊन शैक्षणिक पालकत्व स्विकारत आर्थिक व साहित्याची मदत केली आहे. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रणिताशी दुरध्वनीवरून संपर्क साधल्यानं तिलाही मोठा आधार मिळाला. त्याचसोबत मनसेनं माझ्या पाठिशी असंच राहावं अशी विनंती प्रणितानं राज ठाकरेंना केली. राज ठाकरेंशी संवाद झाल्यानंतर प्रणिताची आई इंदुबाई पवार यांना अश्रू अनावर झाले.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे