ठाणे : ठाण्यातील मैदानांचा वापर खेळांव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांसाठीच अधिक होत असल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर मनसेच्या वतीने बुधवारी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर क्रिकेट खेलो आंदोलन करण्यात आले. शहरातील मैदाने खेळण्यासाठीच मोकळी करावीत, या मागणीसाठी मनसेचे कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनाबाहेर चक्क क्रिकेट खेळले. काही दिवसांपूर्वी मनसेच्या वतीने यासंदर्भात आयुक्त असीम गुप्ता यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु, तरीदेखील मैदानांची सुटका न झाल्याने बुधवारी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी क्रिकेट खेळून पालिकेला जागे करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)
आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसेचे ‘क्रिकेट खेलो’
By admin | Updated: November 20, 2014 03:10 IST