शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अमित ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या दीपाली सय्यद यांना मनसेचा टोला; म्हटलं, “… नया है आप”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 09:41 IST

यापूर्वी दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन गेल्या महिनाभरापासून राज्यात शाब्दीक गदारोळ माजला आहे. काहींनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेला समर्थन दिलं, तर काहींनी त्यांच्या या भूमिकेला विरोधही केला होता. शिवसेनेच्या महिला नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी यापूर्वी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. राज ठाकरे आजपर्यंत कुठेही विजयी झालेले नाहीत, आता तरी विजयी व्हावेत. आता, तरी त्यांची सभा यशस्वी होऊन त्यानिमित्ताने विजय मिळो, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (MNS Amit Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, मनसेनंही त्यांना प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे.

राज ठाकरे यांनी मशिंदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे चा अल्टीमेटम दिला होता. यानंतर पोलिसांनीही कारवाई करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या होत्या. तसंच काहींना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. “तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको,” असं म्हणत दीपाली सय्यद यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. आता मनसेनंही याला प्रत्युत्तर दिलं आहे. “तुम्या मालूम नही रहेग्या... नया नया पॉलिटिक्स आया है ना... राज ठाकरे साहेब घर मै बैठा के फेसबुक लाईव करने वाले लीडर नही है.... सौ से ज्यादा आंदोलन के केस है उनपे... जरा मालूमात किया तो बरा रहेगा ! नया है आप !!,” असं म्हणत मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी दीपाली सय्यद यांना टोला लगवला.

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेdeepali sayedदीपाली सय्यदMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे