शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

“म्हणे हाताला काम... हे राम..,” आजींचा फोटो शेअर करत मनसेचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 10:27 IST

१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. यापूर्वी शिवसेनेनं एक पोस्टर जारी केला होता.

१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. “आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत,” असं उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. दरम्यान, यानंतर शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी एक टीझर जारी केला होता. तसंच त्यानंतर शिवसेनेनं एक पोस्टरही ट्विटरवरून जारी केला होता. 

‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व,’ असल्याचं शिवसेनेनं त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला होता. तसंच यावर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. तसंच ही सभा कुठे आणि किती वाजता आयोजित करण्यात आली असून ‘यायलाच पाहिजे’ असंही  त्यावर नमूद करण्यात आलंय. आता यावरून मनसेचे नेते आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.  काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आजींची भेट घेतली होती. मनसेनं शिवसेनेच्या पोस्टरसह आजींचा फोटो लावला आहे. तसंच त्यात ‘हाता काम…? माझ्या नातवाला तरी आधी नोकरी द्या…’ असं म्हणत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच काळे यांनी या फोटोला “म्हणे हाताला काम.. हे राम,” असं कॅप्शनही दिलंय.

टॅग्स :MNSमनसेShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरे