शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Gajanan Kale : "काय वेळ आलीय... मंडळ चालवत आहेत की पक्ष?"; मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 13:01 IST

MNS Gajanan Kale Slams Shivsena : मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केलं आहेत.

मुंबई - शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचंही नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, यावर आता शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यावरून मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. "काय वेळ आली आहे. मंडळ चालवत आहेत की पक्ष?" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. 

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केलं आहेत. "संपलेल्या पक्षात आता कोणी उरतं की नाही या भीतीने आढळराव यांच्यावरची कारवाई मागे... मंडळ चालवत आहेत की पक्ष..." असं म्हटलं आहे. तसेच "काय वेळ आली आहे ... शिल्लक सेनेच्या उरलेल्या आमदारांना बसून बैठक घ्यायला पण दालन नाही ... ये ना इंसाफी हैं जनाब ..." असंही गजानन काळे यांनी म्हणत शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. 

'३ जुलै रोजी सामना दैनिकात आलेली बातमी ही अनावधानाने छापण्यात आलेली असून शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत,' अशी माहिती शिवसेनेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

आढळराव पाटील यांनी केलं होतं ट्वीट

एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आढळराव पाटील यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. 'गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब' असं ट्वीट त्यांनी केलं होतं. 

टॅग्स :MNSमनसेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण