मुंबई - प्रत्येक राजकीय पक्षाच्या आणि मतदाराच्या मनात जी शंका निर्माण झाली आहे. त्याची एक गोष्ट दुबार मतदार याद्यांची सुरू आहे. मात्र फक्त तिकडे लक्ष ठेवून चालणार नाही. २०१७ पासून मी ओरडून सांगतोय, त्यावेळी मी जे बोलत होतो, आज जे सोबत आहेत त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. मतदार याद्या आहेतच, पण ईव्हीएम मशिनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्वप्नांची राखरांगोळी जर ईव्हीएम मशीन करणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय असा सवाल करत राज ठाकरे यांनी मतचोरीवर भाष्य केले. प्रत्येकवेळी महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मतचोरी मुद्द्यात महाराष्ट्रच पुढे येईल असं त्यांनी सांगितले. मनसेच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
यात राज ठाकरे म्हणाले की, गेली अनेक वर्ष आपण हे ओरडून सांगतोय. मागील १०-१२ वर्षात हे सुरू झाले आहे. लोक आपल्याला मतदान करतायेत. पण या भानगडीतून आपल्याला दरवेळी पराभव पत्करावा लागतो. अख्खा देश यावर बोंबलतोय. या प्रक्रियेतून सत्तेत यायचे आणि हवी तशी सत्ता राबवायची. मतदार याद्या स्वच्छ करा, अजून १ वर्ष निवडणुका लागल्या नाही तरी चालेल. मतदार याद्या स्वच्छ करा आणि निवडणूक घ्या, तुम्ही जिंकला ते आम्ही मान्य करू. सगळ्या गोष्टी लपवायच्या आण त्यातून निवडणूक घ्यायची, म्हणजे मॅच फिक्स आहे. क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग झाल्यावर खेळाडूंना काढण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील शुटींग ही प्रायव्हेसी आहे. एखादा माणूस मत कुठे देतोय ही प्रायव्हसी असू शकते. निवडणूक आयोग कुठलीही उत्तरे देतो अशी टीका त्यांनी केली.
तर महाराष्ट्रात जो मोर्चा निघेल तो दणदणीत झाला पाहिजे. महाराष्ट्रात काय आग पेटलीय हे दिल्लीला कळायला हवे. मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्रात काय राग आहे तो दाखवून द्या. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रामाणिक मतदारांचा हा अपमान सुरू आहे. मतदार उन्हात रांगेत उभे राहतोय. मात्र त्यांच्या मताचा अपमान केला जातोय. या देशातील निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत. जय कुणाचा पराजय कुणाचा हे निवडणुकीनतंर पाहता येईल. प्रगत देशात आजही बॅलेट पेपरवर मतदान होतात. जेवढे पुढारलेले देश आहे तिथे बॅलेट पेपर वापरला जातो. १ तारखेच्या मोर्चाला मी लोकलने जाणार आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पर्यटन विभाग नमो पर्यटन केंद्र उभारणार आहे. ही केंद्रे शिवनेरी, रायगड, राजगड येथे काढली जातायेत. ज्या ठिकाणी फक्त आमच्या महाराजांची नाव असले पाहिजे तिथे नमो पर्यटन केंद्र उभारली जातातेय. सत्ता असो वा नसो जिथे हे पर्यटन केंद्र उभी राहतील तिथे फोडणार...मला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? मला समोर दिसेल ते मिळाले पाहिजे, ज्यांना खुश करायचे त्याला खुश करू. हे सगळे सत्तेतून येते त्यामुळे आपल्याला बारीक लक्ष ठेवले पाहिजे असं सांगत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
मेळाव्यात मतचोरीबाबत प्रेझेंटेशन
ईव्हीएम हटाव सेनेकडून अमित उपाध्याय, यक्षित पटेल यांनी मनसे कार्यकर्त्यांसमोर प्रेझेंटेशन केले. दिल्ली आयटीमधून सॉफ्टवेअर इंजिनिअरींग शिक्षण घेतलेले राहुल मेहता यांनी ईव्हीएमची डमी मशीन बनवली आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक आणि बॅलेटमध्ये कशी मतचोरी होऊ शकते त्याचा डेमो दाखवण्यात आला. या मशीनमध्ये प्रॉग्राममध्ये बदल करता येतात. याला हॅकिंग म्हणत नाहीत, तर प्रॉग्रोम म्हणतात असं अमित उपाध्याय यांनी सांगितले. या प्रेझेंटेशनमध्ये उपाध्याय यांनी कशाप्रकारे ईव्हीएममध्ये प्रॉग्रामद्वारे मते फिरवली जाऊ शकतात याचे प्रात्यक्षिक दाखवले.
Web Summary : Raj Thackeray alleges EVM manipulation, demanding voter list purification and transparent elections. He criticized the Election Commission and Maharashtra government's tourism plans. MNS presented EVM 'hacking' demonstration.
Web Summary : राज ठाकरे ने ईवीएम में हेरफेर का आरोप लगाया, मतदाता सूची शुद्ध करने और पारदर्शी चुनाव की मांग की। उन्होंने चुनाव आयोग और महाराष्ट्र सरकार की पर्यटन योजनाओं की आलोचना की। एमएनएस ने ईवीएम 'हैक' प्रदर्शन प्रस्तुत किया।