शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

मोदी सरकारच्या CAAला मनसेचं समर्थन?; खुद्द राज ठाकरेंनीच केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 15:48 IST

CAA ( Citizen Amendment Act ): कृष्णकुंजवर मनसेची बैठक; राज ठाकरेंकडून सीएएबद्दलची भूमिका स्पष्ट

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या देशात सीएए-एनआरसीविरोधात निघणाऱ्या मोर्चांविरोधात आपण मोर्चा काढणार, मोर्चाला मोर्चानं उत्तर देणार अशी भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली होती. यानंतर आता राज यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. माझं सीएएला समर्थन नाही. मनसेचा ९ फेब्रुवारीला निघणारा मोर्चा कायद्याच्या समर्थनार्थ नसेल, तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱ्या मोर्चांविरोधात असेल, असं म्हणत राज ठाकरेंनी म्हटलं आहे.मनसेत मतभेद; राज ठाकरेंच्या भूमिकेवर पदाधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्तीआज राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची कृष्णकुंजवर बैठक घेतली. या बैठकीत राज यांनी पदाधिकाऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं. 'मनसेचा मोर्चा सीएएच्या समर्थनार्थ नाही. तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चाच्या विरोधात आहे. सीएए आणि एनआरसीबद्दल चर्चा होऊ शकते. मात्र समर्थन नाही,' अशी भूमिका राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. 

काल राज ठाकरेंनी रंगशारदा सभागृहात पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज ठाकरे अवघ्या १० मिनिटांत या बैठकीतून निघून गेले होते. यानंतर पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या भूमिकेबद्दल प्रश्नांची सरबत्ती केली. आपली भाजपाबद्दलची यापुढची भूमिका काय असणार?, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपाला आपण कडाडून विरोध केला. त्याच भाजपासोबत आपण जाणार आहोत का?, सीएए, एनआरसीबाबत आपली नेमकी भूमिका काय?, मनसे या कायद्याच्या तसंच केंद्र सरकारनं यासंदर्भात घेतलेल्या निर्णयांच्या बाजूनं असणार का?, असा प्रश्नांचा भडिमार पदाधिकाऱ्यांनी केला होता.
आपण यापूर्वी भाजपाला कडाडून विरोध केलेला असताना आता अचानक भाजपाच्या समर्थनार्थ जाणार असू, तर आपण लोकांसमोर काय युक्तिवाद करणार आहोत, असाही मुद्दा काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. यामध्ये मुख्यत्वे कल्याण-डोंबिवली व मुंबईतील काही पदाधिकारी आक्रमक होते. मात्र याबद्दल मनसे नेते बाळा नांदगावकर यांना याबाबत स्पष्टीकरण देता आलं नव्हतं. त्यामुळे आज राज यांनी कृष्णकुंजवर बैठक घेत सीएएबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी