शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गडकरीजी, देशात प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या: राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 10:25 IST

राज ठाकरे यांनी दिला आपल्या आठवणींना उजाळा. गडकरींकडे केली मोठी विनंती.

"जगाच्या पाठीवर तुम्हाला अशी इमारत कुठेही सापडणार नाही, ज्याच्या एका मजल्यावर लता दीदी राहायच्या, जिथे आशाताई राहायच्या, पंडित हृदयनाथ मंगेशकर राहतात, उषाताई राहतात, मीनाताई येऊनजाऊन असतात, अशा एका मजल्यावर या देशातल्या चित्रपटसृष्टीतील-संगीत क्षेत्रातील २०-२२ हजार गाणी आहेत. अशा प्रकारची वास्तू जगाच्या पाठीवर कुठे असेल असं मला वाटत नाही. येता जाता मी त्या इमारतीला नमस्कार करतो," असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना झी २४ तास या वृत्तवाहिनीतर्फे 'अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगेशकर कुटुंबीयांसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लता दीदींचं नाव द्या अशी विनंती केली.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. "आजही लता मंगेशकर असं म्हटल्यावर अजूनही चाचपडतोय, आपल्याला लता मंगेशकर सापडलेल्या नाहीत. ज्या दिवशी दीदी गेल्या त्या दिवशी मला एक व्यक्ती भेटल्या. ते म्हणाले लता दीदींना तुम्ही पाहिलंय, भेटलाय तुम्ही, आम्ही त्यांना भेटलो नाही, आम्ही त्यांना ऐकत आलोय आणि ऐकत राहू आमच्यासाठी त्या कुठे गेल्या," अशी एक आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.

मोठ्या प्रोजेक्टला लतादीदींचं नाव द्या "पंडितजींचा संगीताचा प्रवास हा विलक्षण आहे. महाराष्ट्र राज्यानं या सर्वांना उचलून धरलं पाहिजे. तुम्ही देशात मोठमोठे प्रोजेक्ट्स करत असता, देशातला एक प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या. तो इतका विलक्षण आणि मोठा प्रोजेक्ट असला पाहिजे, ज्याला दीदींचं नाव शोभलं पाहिजे," अशी विनंतीह त्यांनी गडकरींकडे केली. अनेकदा मी मित्रांशी, सहकाऱ्यांशी बोलत असतो या देशात कलाकार, संगीतकार, गायक, नाट्यक्षेत्र, साहित्य, कवी, चित्रपटक्षेत्र ही सर्व मंडळी या देशात नसती तर कधीच अराजक आलं असतं. आपण यांच्यात गुंतून पडलो, त्यांच्यावर प्रेम केलं, त्यात शिरलो म्हणून इतर वाईट गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं. यांचे आभार मानावे तर कसे हेच समजत नाही असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेLata Mangeshkarलता मंगेशकरNitin Gadkariनितीन गडकरी