शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray vs MNS: "कर्तृत्वहीन माणसाला सहानुभूतीची गरज असते. पण लक्षात ठेवा..."; उद्धव ठाकरेंवर मनसेचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 13:36 IST

उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी शिवसैनिकांना केलेल्या आवाहनावरून मनसेने केला पलटवार

Sanjay Raut vs BJP, Maharashtra Political Crisis: निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिले आहे. यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा ठाकरे गटाकडून शिंदे गटाने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ज्यांची त्यांचे शिवसेना भवन असणार आहे. कारण शिवसेना भवन हे शिवसेनेचे प्रतिक आणि नावावर आहे. ते पक्षाचे मुख्यालय आहे. यामुळे शिंदे गट शिवसेना, धनुष्यबाणानंतर आता शिवसेना भवनावरही दावा सांगणार असल्याची शक्यता आहे. याच दरम्यान शिवसैनिकांची सहानुभूती उद्धव ठाकरे यांना मिळत असल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे. पण याच मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र उद्धव यांना सणसणीत टोला लगावला आहे.

मी मुद्दामहून तुम्हाला रस्त्यावर भेटायला आलेलो आहे. कारण यापुढची लढाई ही रस्त्यावर लढायची आहे. धनुष्यबाण कोणी चोरला ते तुम्हाला माहिती आहे. चोर बाजाराचा मालक कोण ते देखील माहितीये. या चोरांना आणि त्यांच्या मालकाला गाडल्याशिवाय शांत रहायचे नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बाळासाहेब ठाकरें प्रमाणे ओपन जीप म्हणजेच सनरुफ उघडून शिवसैनिकांना संबोधित केले. त्या फोटोवरून मनसेचे संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. "कर्तृत्वहीन माणसाला सहानुभूतीची गरज असते. पण लक्षात ठेवा मराठी माणूस भावनिक आहे, मूर्ख नाही; त्याला तुमची नाटकं माहित आहेत," असं ट्विट करत देशपांडे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर आरोप

"धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील असं म्हणत इशारा देखील दिला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  "माझी खात्रीची माहिती आहे.... चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत... हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील... देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते..." असं राऊत यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगShiv Senaशिवसेना