शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“१०० टक्के आपली कामे पूर्ण होतील, लवकरच आपण सत्तेत असू”; अमित ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 17:50 IST

MNS Amit Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना अमित ठाकरे यांनी हा विश्वास व्यक्त केला.

MNS Amit Thackeray: अलीकडील काळात पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावरून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचे बॅनर राज्यातील काही ठिकाण लागल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यावरून केवळ महाविकास आघाडीत नाही तर राष्ट्रवादीतही मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहेत. शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असावेत, असे म्हणत आहेत. तर भाजपवाले देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे सांगत आहेत. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी केलेल्या विधामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. 

एका कामगार मेळाव्यात अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे सहभागी झाले होते. या सभेला संबोधित करताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, अमित राजकारणात आल्यापासून आळशी झाली आहे. इथे येणार नव्हते पण फक्त तुमच्यासाठी आले. कामगार कपात सगळीकडे सुरु आहे. त्यात आपण कामगारांना न्याय देत आहात. तुमच्या कामाचा कौतुक करण्यासाठी आले आहे. पुढच्या वर्षी येणार नाही कारण पुढच्या वर्षी माईक हा अमितच्या हातात गेला पाहिजे. बाकीच्यांची टीम ६० प्लस आहे. आपली टीम तरुण आहे. कठीण काळात तुम्ही कामगारांना न्याय मिळवून देत आहात. सगळ्यांनी चांगले काम केले आहे, म्हणून एवढे युनिट वाढले आहेत, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या मेळाव्याला अमित ठाकरे यांनीही संबोधित केले.

१०० टक्के आपली कामे पूर्ण होतील, लवकरच आपण सत्तेत असू

या मेळाव्यात बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, वास्तविक पाहता या मेळाव्यासाठी निमंत्रण आले तेव्हा माझा आधीच एक कार्यक्रम ठरलेला होता. मात्र, तुमच्यासाठी इथे आलो आहे. इथे फक्त कामगार सेनेची ताकद बघायला आलो आहे. तुम्ही उगाच माझे नाव घेतात. हे सगळे तुमचे कष्ट आहेत. तुम्ही म्हणतात ५० टक्के कामे होतात, काही कामे होत नाहीत. कधी कामे होत नाहीत. आपण लवकरच सत्तेत असू, आपली १०० टक्के कामे पूर्ण होतील, असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, सध्या राजकारणात कुस्त्या सुरु आहेत. उद्धव ठाकरेंची कुस्ती एकनाथ शिंदेंसोबत सुरु आहे तर फडणवीस सोबत सुद्धा कुस्ती सुरु आहे. संजय राऊत विरुद्ध नितेश राणे अशी कुस्ती सुरु आहे. अजित पवार यांची घरातच कुस्ती सुरु आहे. बारसूमध्ये पण कुस्ती सुरु आहे. कोण कोणाच्या समर्थनार्थ आहे कोण विरोधात हेच कळत नाही. राज ठाकरे यांची या कुस्तीत एन्ट्री होईल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसे