शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

' ऐ दिल है मुश्किल'च्या विरोधात मनसेचे करण जोहरच्या ऑफीसबाहेर निदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2016 16:36 IST

पाकिस्तानी कलाकार फवाद खानची भूमिका असलेल्या ' ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाला विरोध दर्शवत मनसे कार्यकर्त्यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या ऑफीसबाहेर निदर्शने केली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27 - पाकिस्तानी कलाकारांना हिंदी सिनेजगताने कामे देऊ नयेत, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता कडक पवित्रा घेतला आहे. आज दुपारी 12च्या सुमारास अंधेरी (पश्चिम)येथील करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या कार्यालयाबाहेर मनसैनिकांनी निषेध व्यक्त करत आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पाकिस्तानी कलाकार फवाद खान याला घेऊन ह्यए दिल है मुश्कीलह्ण हा सिनेमा बनवणा-या करण जोहरने परवा पाकिस्तानी कलाकारांवर निर्बंध घालणे गैर असल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्याच्या या मताचा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी कडक समाचार घेतला. शालिनी ठाकरे म्हणाल्या, करोडो भारतीय करण जोहर यांचे सिनेमे बघतात. त्याच्या जोरावरच ते करोडो रुपये कमवतात. मग भारतीयांच्या भावनांचा आदर का केला जात नाही?मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर व कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात करण जोहरला लिहिलेले पत्र घेऊन मनसेचे पदाधिकारी आज करण जोहरच्या कार्यालयात गेले होते. या पत्रात पाकिस्तानी कलाकार असलेला सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याची स्पष्ट ताकीद देण्यात आली होती. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर करण जोहरचा निषेध करत घोषणाबाजी केली. याविरोधात कारवाई करत आंबोली पोलिसांनी मनसेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई, विशाल हरयान, रशीद शेख, प्रदीप पांचाळ, सचिन तळेकर, प्रशांत राणे, छतील सावंत, विशाल हळदणकर, देवेंद्र मांजरेकर, गोविंद मालवीय या कार्यकर्त्यांना अटक केली.

यासंदर्भात मनसेची भूमिका मांडताना शालिनी ठाकरे म्हणाल्या, "पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमा बनवणा-यांवर कारवाई करण्याऐवजी भाजप सरकार देशावर प्रेम करणा-या मनसैनिकांना अटक करतंय, याहून मोठे दुर्दैव ते कोणते. मात्र पाकिस्तानी कलाकारांविरोधातील मनसेचे आंदोलन अजिबात मागे घेतले जाणार नाही, उलट ते अधिक प्रभावी करण्यासाठी गरज भासल्यास मनसैनिक पुन्हा पुन्हा रस्त्यावर उतरतील." लेखी पत्रात म्हटल्याप्रमाणे "ए दिल है मुश्कील हा सिनेमा मनसे कदापि प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही", असेही शालिनी ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले..
 
आणखी वाचा :  
(ऐश्वर्या, शाहरुखचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - मनसे)
(पाकिस्तानी कलाकारांनो, ४८ तासांत भारत सोडा, नाहीतर... - मनसे)
(मनसेच्या धमकीनंतर फवाद खानची भारतातून 'कलटी'?)
 
  •