शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

धाराशिव जिल्हा बँकेच्या प्रकरणातही आमदार सुनील केदार आरोपी; सुनावणी मार्च महिन्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 07:22 IST

रोखे खरेदीसाठी दिलेले ३० कोटी राज्य बँकेत ठेवले

- राजेश शेगाेकार लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा बँकेतील राेखे खरेदी घाेटाळ्याचे लाेण मराठवाड्यातील  धाराशिव जिल्हा बँकेतही पाेहोचलेले आहे. तेव्हाच्या उस्मानाबाद जिल्हा बँकेने राेखे खरेदीसाठी नागपूर जिल्हा बँकेकडे वर्ग केलेल्या रकमेचा घाेटाळा चांगलाच गाजला होता. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन संचालक, अधिकारी यांच्यासह सुनील केदार यांच्यावरही धाराशिव येथे गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ मार्च २०२४ रोजी आहे.

धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांनी कोणत्याही बैठकीत विषय न ठेवता संगनमताने नागपूर जिल्हा बँकेकडे रोखे खरेदीसाठी ३० कोटी रुपये २००२ साली वर्ग केले होते. पुढे नागपूर बँकेने हीच रक्कम सुरक्षा ठेव म्हणून महाराष्ट्र राज्य बँकेकडे वर्ग केली होती. या रकमेवरील व्याज नागपूर बँकेनेच परस्पर उचलले. या प्रकारात धाराशिवच्या बँकेचे ३० कोटी रुपये अडकून पडले. आजही ही रक्कम व त्यावरील व्याज मिळालेले नाही. हे प्रकरण पुढे तीन ते चार वर्षांनी बाहेर आले. त्याची चौकशी होऊन १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सुनील केदार हे दहाव्या क्रमांकाचे आरोपी आहेत. 

 नागपूरचे धाराशिव कनेक्शन   तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष पवन राजे निंबाळकर यांनी २००२ मध्ये  रोखे खरेदी करण्यासाठी ३० कोटी रुपये नागपूर जिल्हा बँकेत गुंतवले होते.  ही  रक्कम होमट्रेड या खासगी कंपनीमार्फत राेखे खरेदीसाठी वापरली जाणार हाेती. मात्र, प्रत्यक्षात रोखे खरेदी व्यवहार झाला नाही.  फसवणूक झाल्याचे समाेर आल्यावर बँकेने उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला.  यामध्ये उस्मानाबाद बँकेच्या बाजूने निकाल आल्यावर त्याविरुद्ध नागपूर जिल्हा बँकेने मार्च २००५ मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले.  १३ मार्च २०१३ रोजी उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यानंतर नागपूर बँकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यामुळे केदार यांच्या अडचणी वाढल्या. 

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारfraudधोकेबाजी