शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे कधी भरणार?; सत्यजीत तांबेंनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 19:01 IST

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार केला.

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार केला. १६५ वर्षांपेक्षाही प्रदीर्घ ज्ञानदानाची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठातील अनेक महत्त्वाच्या विभागांची अवस्था सध्या बिकट आहे. अर्थशास्त्र, गणित, भूगोल, इतिहास, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा अनेक विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे ५० टक्क्यांपेक्षा जास्त रिकामी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असून विद्यापीठातील संशोधनाचा दर्जाही घसरला आहे. या प्रश्नी आता आमदार सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेतला असून ही पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठवलं आहे. 

मुंबई विद्यापीठ हे देशातील एक अग्रणी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचं नाव जागतिक पातळीवरही अभिमानाने उच्चारलं जातं. या विद्यापीठाला १६५ पेक्षा जास्त वर्षांचा देदिप्यमान इतिहास आहे. पण सध्याची अवस्था अत्यंत बिकट असून ज्ञानदानाचं काम करणाऱ्या प्राध्यापकांचीच उणीव आहे. विद्यापीठातील १० महत्त्वाच्या विभागांमध्ये ५८ टक्क्यांपेक्षा जास्त प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत. हे विद्यापीठासाठी आणि राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेसाठी नक्कीच भूषणावह नाही, असं सत्यजीत तांबे यांनी पत्रात म्हटलं आहे.

सत्यजीत ताबेंनी व्यक्त केली खंतविद्यापीठांमधील प्राध्यापक फक्त मुलांना शिकवण्याचंच काम करत नाहीत. ते आपापल्या विषयांमध्ये मौलिक संशोधन देखील करत असतात. कोणत्याही विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या या संशोधनांमुळेच त्या विद्यापीठांचा दर्जा उंचावतो. पाश्चात्य देशांमध्ये विभागांमधील प्राध्यापक ज्ञानदानासह आपल्या विषयाच्या संशोधनातही व्यग्र असतात. आपल्याकडेही अनेक विद्यापीठांमध्ये हे चित्र दिसतं. पण त्यासाठी एखाद्या विभागात प्राध्यापकांची मंजूर पदं भरलेली असणं आवश्यक आहे. समजा विभागात प्राध्यापकांची संख्या कमी असेल, तर त्या प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यावरच भर द्यावा लागतो. त्यांना आपल्या विषयातील संशोधनासाठी वेळच उरत नाही, अशी खंत तांबेंनी व्यक्त केली.

तसेच अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, लॉ, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल, इंग्रजी, गणित, राज्यशास्त्र या ज्ञानाच्या प्रमुख शाखा आहेत. याच विभागांमध्ये ५८ टक्के पदं रिक्त असणं हे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी अजिबातच भूषणावह नाही. त्यामुळे उच्च शिक्षणमंत्र्यांनी या गोष्टीची तातडीने दखल घेऊन प्राध्यापकांची रिक्त पदं भरण्याच्या दृष्टीने योग्य पावलं उचलावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

"ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी"मुंबई विद्यापीठाचा दर्जा कायम राखणं नाही, तर तो सुधारणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या विद्यापीठाचा आवाका खूप मोठा आहे. देशात आपल्या या विद्यापीठाचा नावलौकिक आहे. पण गुणात्मक संशोधनात आपण मागे राहिलो, तर ते भविष्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरेल. तसंच त्यामुळे प्राध्यापकांची प्रगती खुंटेल आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणावरही होणार आहे. त्यामुळे हा दर्जा कायम राखणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, असे सत्यजीत ताबेंनी आणखी नमूद केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSatyajit Tambeसत्यजित तांबेMumbai Universityमुंबई विद्यापीठ