शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार संजय रामुलकरांनी चक्क धरणात घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 17:59 IST

MLA Sanjay Ramulkar jumped into the Pentakli dam : आंदाेलनाची अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने आमदार रायमुलकर यांनी धरणाच्या पाण्यात उडी घेतली़.

हिवरा आश्रम: पेनटाकळी प्रकल्पाचा कालव्यामुळे अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. कालव्यातून पाणी पाझरत असल्यामुळे त्यांच्या जमिनी वहिती होत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी करून ही संबधीत विभागाने त्याची दखल घेतली नाही़ त्यामुळे, संतप्त झालेल्या आमदार संजय रायमुलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांसह आंदाेलन सुरू केले़. या आंदाेलनाची अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने आमदार रायमुलकर यांनी धरणाच्या पाण्यात उडी घेतली़. त्यामुळे, प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली हाेती़. तरफ्यावर असलेल्या लाेकांनी आमदारांना वाचवले़.एक महिन्याच्या आत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी सायंकाळी आपले आंदाेलन मागे घेतले़पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे दुधा, रायपुर ,पेनटाकळी या शिवारात प्रकल्पातून पाणी पाझरत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत जमिनी नापिकी झाल्या आहेत. ठिकठिकाणी या कालव्याला भगदाड पडले आहेत. या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे झिरो ते अकरा किलोमीटर पर्यंतचा कालवा बंद करून पेनटाकळी प्रकल्पातून पाणी हे बंद नलिकेद्वारे नेण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीचा पाठपुरावा खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर हे वेळोवेळी करीत आहेत. मात्र, त्याकडे अधिकाऱ्यांकडून सातत्याने दुर्लक्ष हाेत आहे़  अधिकारी याची दखल घेत नसल्याने आ. रायमुलकर यांनी सोमवारी प्रकल्पाच्या पाण्यात बसून आंदोलन केले.

यंत्रणेची उडाली तारांबळ   सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आ. रायमुलकर हे प्रकल्पाच्या पाण्यात उतरले .मात्र या आंदोलनाची कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. यामुळे आ. रायमुलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात उडी घेतल्यानंतर सर्व यंत्रणेची तारांबळ उडाली. पेनटाकळी प्रकल्पाचा पाण्यात तरफ्यावर बसलेले रामा अत्तरकर व पोलीस कर्मचारी काशीकर यांनी त्यांना वाचविले. त्यानंतर त्या ठिकाणी दुपारी चार वाजता अधिकारी दाखल झाले.खासदार जाधव यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली़ यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव,दिलीपबाप् देशमुख, कार्यकारी अभियंता राळेकर, तहसिलदार डा.संजय गरकल, सिध्देश्वर पवार, एकनाथ सास्ते यांचेसह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

  पेनटाकळी प्रकल्पाचा कालव्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात. अन्यथा यापुढे शेतकऱ्यांसह स्वतःच्या कुटुंबासोबत पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात आंदोलन करण्यात येईल.आ. डॉ. संजय रायमुलकर.मेहकर

टॅग्स :Sanjay Raymulkarसंजय रायमुलकरagitationआंदोलनbuldhanaबुलडाणा