शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

...अन् शिवरायांच्या वेषातील आमदारानं नेत्याला केला मुजरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 14:00 IST

एकीकडे विधानसभेत आरक्षणावरून वातावरण तापले असताना आमदार प्रकाश गजभिये यांची वेषभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती.

मुंबई - राज्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आज विधिमंडळात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून आले होते. एकीकडे विधानसभेत आरक्षणावरून वातावरण तापले असताना प्रकाश गजभिये यांची वेषभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण केल्यानंतर गजभिये यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते टीकेचे लक्ष्य होऊ लागले आहेत. त्याचे झाले असे की, नेहमीच विविध वेशभूषा करून विधिमंडळात येणाऱ्या गजभिये यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून विधिमंडळाच्या आवारात प्रवेश केला. त्या दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गजभिये यांनी राज्य सरकारला खरमरीत प्रश्नही विचारले. मात्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे विधिमंडळ परिसरात आगमन होताच आमदार महोदयांना आपण शिवरायांच्या वेशात आहोत, याचे भान राहिले नाही. त्यांनी त्याच वेशामध्ये रामराजे नाईक-निंबाळकरांना मुजरा केला. रामराजे नाईक-निंबाळकरही त्यांना अभिवादन करत पुढे निघून गेले. मात्र गजभिये यांच्या या कृतीमुळे तिथे उपस्थित असलेल्यांना धक्का बसला. अनेक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून अनेक जण येतात. मात्र छत्रपतींची वेशभूषा केल्यानंतर संबंधित व्यक्तीने छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे वागणे अपेक्षित असते. मात्र नेमकी इथेच गजभिये यांच्याकडून चूक झाली. (छायाचित्र - सुशील कदम)

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Gajbhiyeप्रकाश गजभियेRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरMaharashtraमहाराष्ट्र