शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

आमदार प्रकाश आवाडे भाजपचे कमळ हातात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:01 IST

Politics, Devendra Fadnavis, Bjp, PrakashAwade, Kolhapur माजी मंत्री व इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या घडामोडी आहेत. त्यांना पक्षाने जिल्हाध्यक्षपद ऑफर केले आहे.

ठळक मुद्दे आमदार प्रकाश आवाडे भाजपचे कमळ हातात घेणार, पक्षातून हालचालीकोल्हापूरचे जिल्हाध्यक्षपद शक्य

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : माजी मंत्री व इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या घडामोडी आहेत. त्यांना पक्षाने जिल्हाध्यक्षपद ऑफर केले आहे.

त्यांनी भाजपमध्ये न जाता काँग्रेसमध्ये यावे यासाठी त्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच.के.पाटील हे आज सोमवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी आवाडे यांची भेट घेणार आहेत. एका लग्नाच्यानिमित्ताने एच.के.पाटील इचलकरंजीत आले आहेत.आवाडे व खासदार गिरिश बापट यांचे दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात पुण्यात प्राथमिक बैठक झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आवाडे यांची चर्चा झाल्याचे सुत्रांकडून समजले. पुढील आठवड्यात फडणवीस व पक्षाचे सर्वेसर्वा अमित शहा यांच्यासोबत आवाडे यांची भेट होणार असल्याचे सांगण्यात येते.

आज सोमवारी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्या मुलग्याचा विवाह सोहळा आहे. राजेश पाटील हे काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या लग्न सोहळ्यास ते उपस्थित राहिले आहेत. त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन आवाडे यांच्या निवासस्थानी करण्यात आले आहे. 

  1. गत निवडणूकीत इचलकरंजी मतदार संघातून भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांचा एकतर्फी पराभव करून आवाडे विजयी झाले आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. सध्या ते आमदार असले तरी जिल्ह्याच्या राजकारणाच्या मुख्य धारेपासून थोडेसे बाजूला पडले आहेत.
  2. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असले तरी ते विधानसभेला कोथरूड मतदार संघातून विजयी झाल्याने कोल्हापूरच्या राजकीय घडामोडीकडे लक्ष द्यायला त्यांना मर्यादा येत आहेत.
  3. सध्या महाडिक गट भाजपमध्ये सक्रीय आहे परंतू कोल्हापूरची जनता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही.
  4. सध्याचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे चांगले काम करत असले तरी कागल विधानसभा हे त्यांचे मुख्य टार्गेट आहे. आता कोल्हापूरात महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. तेथील पक्षापुढील आव्हान मोठे आहे. 
टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Awadeप्रकाश आवाडेkolhapurकोल्हापूरBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस