शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

लवकरच आमदार ग्राम योजना!

By admin | Updated: December 2, 2014 04:18 IST

केंद्राच्या सांसद आदर्श ग्राम योजनेप्रमाणे राज्यात ‘आमदार ग्राम योजना’ राबविण्याचे विचाराधीन आहे. तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेस पाठवणार

अहमदनगर : केंद्राच्या सांसद आदर्श ग्राम योजनेप्रमाणे राज्यात ‘आमदार ग्राम योजना’ राबविण्याचे विचाराधीन आहे. तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेस पाठवणार असल्याची माहिती ग्रामविकास तथा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे दिली.सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत हिवरेबाजार येथे झालेल्या सरपंचांच्या पहिल्या कार्यशाळेत बोलताना मुुंडे म्हणाल्या, केंद्राची योजना केवळ सोपस्कार नसून एक संस्कार आहे. गावातील सर्व घटकांनी एकत्र येऊन तळमळीने काम केले तर प्रत्येक गाव आदर्श होईल. कार्यकर्ते विकासकामांसाठी निधी नेतात. मात्र, १०० टक्के निधी खर्च करीत नाहीत. आता तसे होणार नाही. जो खर्च करणार त्यालाच निधी मिळणार. ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी आदर्श गाव योजना राबविण्यात येत आहे. त्यात नियोजन, सातत्य, लोकसहभाग असेल तरच कोणतीही योजना १०० टक्के यशस्वी होईल. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न मी पूर्ण करणार असल्याचे पंकजा यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेत आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार, समन्वयक श्रावण हार्डिकर यांनी मार्गदर्शन केले. आदर्श गाव योजनेत राजकारण आणू नका, लोकांमध्ये विश्वास निर्माण करा, अशी सूचनाही त्यांनी केली. राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. लोक हरिनाम सप्ताहावर लाखो रुपये खर्च करतात. मात्र, गावात शौचालय बांधत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)> अशी आहेआमदार ग्राम योजना़़़प्रत्येक आमदाराने मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करावा, असे अपेक्षित आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना या माध्यमातून राबविण्यात येतील. > जलयुक्त शिवार अभियानजलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत राज्यातील प्रत्येक गावात पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम राबवून पाण्याचे नियोजन करण्यात येईल.