शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आमदार अपात्रता सुनावणी: शिंदेंना हटविण्यासाठी ठाकरेंनी वाट का पाहिली?; शिंदे गटाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 08:14 IST

विधान भवनातील सलग सुनावणीच्या आठव्या दिवशीही पक्षप्रमुखपद आणि व्हिप यावर जेठमलानी यांनी प्रश्नांचा भडिमार  केला.

मुंबई - एकनाथ शिंदे व १५ आमदार यांच्याविरोधात अपात्रता याचिका २४ जून रोजीच दाखल झाली. मग एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ३० जूनपर्यंत वाट का पाहिली, असा सवाल शिंदे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी शनिवारी सुनील प्रभू यांच्या उलटतपासणीत केला. पक्षविरोधी कृत्य होऊ नये म्हणूनच विश्वासदर्शक ठरावावेळी पक्षादेश काढल्याचे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी नमूद केले.

विधान भवनातील सलग सुनावणीच्या आठव्या दिवशीही पक्षप्रमुखपद आणि व्हिप यावर जेठमलानी यांनी प्रश्नांचा भडिमार  केला. सुनील प्रभू आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यालयीन सचिव विजय जोशी यांची उलटतपासणी घेण्यात आली. ठाकरे गटाची सुनावणी आता पूर्ण झाली आहे. ७ डिसेंबरपासून नागपूरात शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून होईल.

एकनाथ शिंदेंचा विधिमंडळ डायरीतील ई-मेल सादरएकनाथ शिंदे यांना ज्या मेलवरून पक्षादेश पाठवला तो मेलच खोटा असल्याचा दावा जेठमलानी यांच्याकडून करण्यात येत होता. अखेर विधिमंडळाची डायरी सादर करीत या डायरीत नमूद असलेला ई-मेल आणि ज्यावरून पक्षादेश पाठवला तो मेल एकच असल्याचे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले. या ई-मेलसंदर्भात ज्यांनी (एकनाथ शिंदे) तक्रार केली त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची हिंमत का दाखवली नाही, असा सवाल ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला.

४ जुलै, २०२२ चा व्हिप सर्वांनाचसरकार स्थापनेनंतर ४ जुलै रोजी झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी सरकारविरोधी मतदान करण्याचा पक्षादेश प्रभू यांच्याकडून का काढण्यात आला, असा सवाल जेठमलानी यांनी केला. त्यावर काही आमदार पक्ष विरोधी मतदान करणार असल्याचे समजल्याने सर्वच आमदारांना हा व्हीप काढण्यात आला होता असे प्रभू यानी सांगितले.

हिंदुत्वावर प्रश्नचिन्हशिवसेना पक्षाच्या विचारधारेत हिंदुत्वाचा समावेश होता का, असा सवाल जेठमलानी यांनी केला. त्यावर हो नक्की आहे असे उत्तर प्रभूंनी दिले. बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट नावाने ओळखले जाते, हे माहीत आहे का, या सवालावर हे सर्व जगाला माहीत असल्याचे प्रभू म्हणाले. शिवसेना राजकीय पक्ष किंवा शिवसेना पक्षप्रमुख यांनी हिंदुत्वाची भूमिका मवाळ घेण्याचा निर्णय घेतला होता का, असा सवाल जेठमलानी यांनी केला तेव्हा हे धादांत खोटे आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) कधीही हिंदुत्वाच्या विचारांपासून लांब जाऊ शकत नाही, असे प्रभू म्हणाले. तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा राजकीय पक्ष नसून राजकीय नेत्यांचा समूह आहे, असा दावा जेठमलानींनी केला असता तोही प्रभू यांनी फेटाळला.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना