शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या तान्हुलीचे अपहरण करणा-यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 05:36 IST

५० हजाराच्या खंडणीसाठी मित्राच्या १० महिन्यांच्या मुलीचे अपहरण करणा-याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली...

नागपूर : ५० हजाराच्या खंडणीसाठी मित्राच्या १० महिन्यांच्या मुलीचे अपहरण करणा-याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतुल अनंतराव काटे (४०) असे शिक्षा झालेल्याचे नाव असून, तो गोव्यातील तलीगाव अराडीबंदयेथील रहिवासी आहे.या प्रकरणात अतुलची पत्नी विशाखा (३४) हीसुद्धा आरोपी असून, ती खटला सुरू असतानाच फरार झाली होती. त्यामुळे तिला अटक होताच तिच्याविरुद्ध वेगळा खटला चालविण्यात येणार आहे. न्यायालयाने तिला फरार घोषित करून अटक करण्याचे  निर्देश पोलिसांना दिले आहेत.सृष्टी मनोज वैरागडे असे अपहृत मुलीचे नाव असून, ती अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उल्हासनगरच्या श्रीधेनू कॉम्प्लेक्स येथील रहिवासी आहे. सृष्टीचे वडील मनोज आणि आरोपी अतुल काटे हे वर्गमित्र होते. २७ जून २०१४ रोजी दुपारी आरोपी काटे दाम्पत्य मनोज वैरागडे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी वैरागडे यांची पत्नी वंदना ही सृष्टीसोबत घरी होती. सृष्टीला फ्रॉक आणि खाऊ घेऊन देतो, असे वंदनाला सांगून आरोपी दाम्पत्य सृष्टीला सोबत घेऊन गेले. सायंकाळ होऊनही काटे दाम्पत्य सृष्टीला घेऊन परत न आल्याने वैरागडे कुटुंबाने त्यांचा शोध सुरू केला होता. काही वेळानंतर काटे दाम्पत्याने मनोजला मोबाइलवर फोन करून आणि एसएमएस पाठवून ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे. ती जिवंत पाहिजे असेल तर आम्हाला ५० हजार रुपये पाठवा’, असे म्हटले होते. वंदना वैरागडे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी भादंविच्या ३६३, ३६४ -ए, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी अपहृत मुलगी आणि अपहरणकर्त्यांच्या शोधार्थ चार पथके तयार करून इतरत्र पाठविली होती. दरम्यान, मुलगी मिळावी म्हणून मनोज वैरागडे यांच्या एका मित्राने ३० हजार रुपये एसएमएसनुसार विशाखा काटे हिच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केले होते. आरोपी दाम्पत्याने शेगाव, अकोला आणि अन्य एका ठिकाणाहून २५ हजार रुपये एटीएममधून काढून घेतले होते.

टॅग्स :Courtन्यायालय