मुंबई : मित्राचा मोबाइल बळकाविण्यासाठी त्याची हत्या करणाऱ्या आरोपीच्या घाटकोपर पोलिसांनी शनिवारी मुसक्या आवळल्या. कामरान सिद्धिकी असे अटक आरोपीचे नाव असून, शनिवारी त्याला जे.जे. मार्ग येथून अटक करण्यात आली. घाटकोपर पश्चिमेकडील सुंदर बाग परिसरात सिद्धिकी राहण्यास आहे. गुरुवारी रात्री त्याच परिसरातील मित्र निरज सिंह (२३) आणि विकास इसावे मोबाइल खरेदीसाठी आले होते. मोबाइल घेऊन दोघेही परतत असताना कामरानने निरजकडून त्याचा मोबाइल पाहण्यासाठी घेतला. मित्र म्हणून त्याने त्याच्याकडील मोबाइल कामरानकडे दिला. याच संधीचा फायदा घेत कामरान मोबाइल घेऊन पळायला लागला. दोघांनीही त्याला अडविण्याचा प्रयत्न केल्याने दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. याच रागात कामरानने त्याच्याकडील चाकूने दोघांवर हल्ला चढविला. उपचारादरम्यान निरजचा मृत्यू झाला. तर विकासची प्रकृती चिंताजनक आहे.
मित्राची हत्या करणारा अटकेत
By admin | Updated: May 30, 2016 02:02 IST