नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पस्थितीत झालेल्या मिहान आढावा बैठकीत विविध प्रश्नांवर दीर्घ चर्चा झाली. बैठकीला आमदार चंद्रशेखर बावनकुळे, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीणा, उर्जा खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अजय मेहता, अर्थ खात्याचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाचे सत्रे, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मिहानचे मुख्य अभियंता एस.व्ही. चहांदे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी व मिहान इंडस्ट्रिज असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन तास ही बैठक चालली.मिहानला गती मिळेलमिहान प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना अभ्यास आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास जावा अशी त्यांचीच इच्छा आहे. त्यामुळेच सर्वप्रथम त्यांनी याच विषयाची बैठक घेऊन कामाला सुरुवात केली. वीज पुरवठा होत नसल्याने प्रकल्पाची बदनामी होत होती. ती आता थांबेल व प्रकल्पाला गती मिळेल. या प्रकल्पाचा काही भाग माझ्या मतदारसंघात येतो, त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतोचंद्रशेखर बावनकुळे, आमदार, भाजपबुटीबोरीत ‘सिएट’चा प्रकल्पपहिल्या टप्प्यात ४०० कोटींची गुंतवणूकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नागपूरमधील पहिल्याच बैठकीत सिएट टायर्स लि. या कंपनीशी करार केला. या कंपनीतर्फे बुटीबोरी येथे दोन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून १२०० लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सागितले. आरपीजी कंपनी समूहांतर्गत येणाऱ्या सिएट टायर्स लि. या कंपनीने बुटीबोरी येथे ५० एकर जमीनीची मागणी करणारा प्रस्ताव एमआयडीसीकडे सादर केला होता. हा प्रस्तावावर आज चर्चा झाली व या कंपनीला जागा देण्यासंदर्भातीलएक पत्र शासनाकडून देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही कंपनी त्यांच्या उत्पादनाला दोन वर्षाच्या आत सुरुवात करणार आहे. तसे हमीपत्र कंपनीने सादर केले आहे.
मुख्यमंत्र्यांचे मिशन मिहान
By admin | Updated: November 4, 2014 01:04 IST