शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

अल्पसंख्यांक सुरक्षा महासंघाच्या उपाध्यक्षाला घरफोडीप्रकरणी अटक

By admin | Updated: March 15, 2017 20:32 IST

भारतीय अल्पसंख्यांक सुरक्षा महासंघाच्या राज्य उपाध्यक्षाला गुन्हे शाखेने घरफोडीचे गुन्हे केल्याप्रकरणी अटक केली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 15 - भारतीय अल्पसंख्यांक सुरक्षा महासंघाच्या राज्य उपाध्यक्षाला गुन्हे शाखेने घरफोडीचे गुन्हे केल्याप्रकरणी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 15 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वत:च्या अल्पवयीन मुलाला तो घरफोड्या करायला लावीत होता. तपासासाठी पोलीस त्याच्याकडे गेल्यास पदाचा धाक दाखवत त्यांच्याविरुद्ध तक्रारी करीत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यास कोणी धजावत नव्हते. युनिट चारच्या पथकाने त्याच्यासह पत्नी आणि मुलालाही गजाआड केल्याची माहिती प्रभारी अतिरीक्त आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली. नानाभाऊ शंकर लंके (वय 40, रा. अनिरुद्ध अपार्टमेंट, कस्तुरबा सोसायटी, विश्रांतवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याची पत्नी दीपाली हिच्यासह 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंकेकडून 20 तोळे सोन्याचे दागिने, सहा लॅपटॉप, 13 घड्याळे, सात कॅ मेरे, 15 मोबाईल, तीन टॅब, शिलाई मशीन, दुर्बीण हस्तगत करण्यात आली असून त्याची मोटार व एक गावठी कट्टाही जप्त करण्यात आला आहे. त्याने स्वत:च्या अल्पवयीन मुलाकडून विश्रांतवाडी आणि खडकी परीसरात घरफोड्या करुन घेतल्या. चोरीमध्ये मिळालेला मुद्देमाल घेऊन पत्नी दिपालीच्या मदतीने अटक करण्यात आलेला सराफ प्रविण देवराज पारेख (वय 53, रा. भाग्यश्री फॅशन, कुंदन कॉर्नर, खडकी बाजार) याला विकत असत. लंके याच्याकडे घरफोडीतील ऐवज असल्याची माहिती सहायक निरीक्षक नितीन भोयर यांना मिळाली होती. परंतु, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तपासासाठी पोलीस गेल्यास पदाचा धाक दाखवत पुराव्यांची तसेच सर्च वॉरंटी मागणी करुन दबाव टाकत असे. यासोबतच पोलिसांविरुद्ध खोटे अर्ज करीत असल्याने स्थानिक पोलीस कारवाईला धजावत नव्हते. गुन्हे शाखेने ही परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने दिलेले सर्च वॉरंट घेऊन त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी घरामध्ये लॅपटॉप, मोबाईल, घड्याळ, कॅमेरे आदी साहित्य मिळून आले. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना उत्तरे न देता उच्च न्यायालयात बघून घेण्याची धमकी दिली. त्याला अटक करुन न्यायालयामधून दहा दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली. आरोपीच्या मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये कॅमेरा, मोबाईल, लॅपटॉप तसेच एका गावठी कट्ट्यासह अन्य साहित्य मिळून आले. गावठी कट्ट्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी अतिरीक्त आयुक्त तथा उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र तोडकर, सहायक निरीक्षक नितीन भोयर, गणेश पाटील, उपनिरीक्षक विलास पालांडे यांच्या पथकाने केली. आरोपी लंके चोरीचा ऐवज पत्नी दिपालीकडे देत होता. दिपालीसह मिळून हे दागिने सराफ प्रवीण देवराज पारेख याच्याकडे देत असत. पारेख जुने दागिने मोडून त्या सोन्यापासून त्यांना नविन दागिने बनवून देत असे. त्याबदल्यात त्याला 25 टक्के कमिशन मिळत होते. नविन दागिने मुथ्थुट फायनान्स व मणप्पुरम फायनान्समध्ये तारण ठेवून त्याद्वारे आरोपींनी लाखोंचे कर्ज घेतले. पोलिसांनी हे सर्व दागिने जप्त केले आहेत. आरोपींकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याने काही बँकाकडून कर्ज घेतलेले असून हे कर्ज त्याने थकवलेले आहे. बँकेच्या अधिका-यांनाही त्याने पदाचा धाक दाखवल्याने हे अधिकारी त्याच्याकडे वसुलीसाठी जातच नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने राहत्या इमारतीमधील ब-याच सदनिका बळकावल्या असून इमारतीचा ताबा घेतल्याचेही उपायुक्त साकोरे यांनी सांगितले.नानाभाऊ लंके याने 2012 साली एका महिलेला तो भारतीय अल्पसंख्यांक सुरक्षा महासंघाचा अध्यक्ष असल्याची बतावणी करीत मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांशी ओळख असल्याचे सांगितले होते. या महिलेला बढती मिळवून देण्याचे आमिष दाखवत पत्नीच्या मदतीने तिच्याकडून तीन लाख रुपये उकळले होते. त्यानंतर एक लाख रुपये घेऊन तिचे मोबाईलवर फोटो काढून धमकावत पत्नीच्या मदतीने बलात्कार केला होता. यासंदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.