शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

काँग्रेसकडून अल्पसंख्याक जोडो अभियान

By admin | Updated: November 19, 2016 03:26 IST

पालघर जिल्हातील दुरावलेले अल्पसंख्याक व मुस्लिम समाजाला पुन्हा काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली टेन मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे सभा घेण्यात आली

मनोर/पालघर : पालघर जिल्हातील दुरावलेले अल्पसंख्याक व मुस्लिम समाजाला पुन्हा काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली टेन मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे सभा घेण्यात आली. त्यावेळी पालघर जिल्हयाचे आठ तालुक्यातील ख्रिश्चन, पंजाबी, गुजराती, दलित, मुस्लिम व इतर समाजातील अल्पसंख्याक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांची संख्या लक्षणिय होती. सभेचे आयोजन अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुस्तफा मेमन व तालुका अध्यक्ष असिफ मेमन यांनी केले होते.अल्पसंख्याकांना संबोधित करतांना खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, कॉग्रेस शिवाय पर्याय नाही म्हणू आपण मतभेद सोडून पुन्हा कार्याला सुरवात करा व पक्ष बळकट बनवा. ज्या अल्पसंख्याक समजाला त्यांचे हक्क मिळाले नाही ते सत्तेवर आल्यावर प्रथम प्राधान्य देऊन मिळवून देऊ असे आश्वासन दिले. या वेळी डहाणूचे नगरसेवक नदिम शेख यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीकडून कॉँग्रस भवनाचा ताबा घेतला गेल्याचा विषय एैरणीवर आणला. यावेळी बहुजन विकास,राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तरु ण कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दनान धांगे हे म्हणाले की, आज अल्पसंख्यांक मुस्लिम समाजासाठी महाविद्यालय नाही उर्दू शाळेमध्ये शिक्षक नाही. असे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. शमीम शेख यांनी आपल्या भाषणात मुलींना शाळा, महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळत नाही, सरकारी नोकऱ्यांपासून समाज दुरावलेला आहे, शासकीय कार्यालयात गेले तर कामे होत नाही, पोलीस ठाण्यात न्याय मिळत नाही असे अनेक प्रश्न मांडले. यावेळी माजी मंत्री राजेंद्र गावित, जिल्हा अध्यक्ष मनीष गणवरे , महिला अध्यक्ष शमीम शेख उपस्थिती होते. (वार्ताहर)>मुस्लिम तरुणीची धाडसी कैफियतकार्यक्रम सुरु असतांना पुरुष मंडळींनी समाजाचे प्रतिनिधीत्व करुन समस्या मांडत असतांनाच अचानक मुस्लिम समाजातील एक तरु णी आयशा मेमन हिने व्यासपीठावर येऊन माईकचा ताबा घेतला. ती धाडसाने बोलली की, मुस्लिम समाजाच्या मुलींना शिक्षणासाठी पुढे यायला पाहिजे. आधुनिक शिक्षण घेण्यासाठी मुलींना संघर्ष करावा लागतो. तसे न करण्यासाठी घरातून व समाजातून अनेक बंधने लादली जातात. मुस्लिम समाजातील स्त्री जिवन सुधारण्यासाठी त्यांना शिक्षण व सरकारी नोकरी हाच एक मार्ग असल्याने तिने ठामपणे सांगितले.