अलिबाग/कर्जत : दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्याच्या घटना नुकत्याच अलिबाग आणि कर्जत येथे घडल्या. यातील आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अलिबाग येथील आरोपी रफिक उर्फ बाबु हुसेन याच्याविरूद्ध अशाचप्रकारच्या तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अलिबाग येथे घडलेल्या घटनेतील अल्पवयीन मुलीचे कुटुंब देवळाली येथील आहे. मुलीची आई हुसेनच्या घरी घरकाम करायची. गतवर्षी एका गुन्ह्याच्या आरोपाखाली मुलीच्या आईला अटक झाली होती. वडील व्यसनाधीन असल्याने अल्पवयीन मुलीचा आणि तिच्या भावाचा सांभाळ कागदी करीत होता. या दरम्यान कागदीने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. अखेर मुलीने भावासह घरातून पळ काढला. गावात फिरताना ग्रामस्थांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी पीडित मुलगी व तिच्या भावास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी बालग्रामाध्ये दाखल केल्यावर वैद्यकीय तपासणी केल्यावर ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.कर्जत तालुक्यातल्या कडाव येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून अजय फुलावरेने पळवून लोणावळ््यात लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. आरोपी अजय फुलावरेसह पोलिसांनी प्रशांत बडेकर, धनाजी मारके आशिष साबळे या मित्रांना २९ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली.
अल्पवयीन मुलींवर बलात्कार
By admin | Updated: April 23, 2015 05:29 IST