शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर नातेवाईकानेच केला बलात्कार, पीडितेने दिला मुलास जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 22:31 IST

एका मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून आत्याच्या नव-याने तिला कुमारी माता बनविले. आपले नवजात बाळ आणि आईवडिलांना घेऊन पीडित मुलगी मंगळवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात पोहचली. तिची कैफियत ऐकून खुद्द पोलीसही हादरले.

नागपूर -  एका मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून आत्याच्या नव-याने तिला कुमारी माता बनविले. आपले नवजात बाळ आणि आईवडिलांना घेऊन पीडित मुलगी मंगळवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात पोहचली. तिची कैफियत ऐकून खुद्द पोलीसही हादरले. त्यांनी लगेच धावपळ करून आरोपी विजय नाहारकर (वय ३७, रा. सुभाषनगर) याला अटक केली. प्रचंड संतापजनक अशी ही घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.पीडित कुमारी माता आता केवळ १४ वर्षांची आहे. ती गंगाबाई घाट परिसरातील स्वीपर कॉलनीत राहते. काही वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झाले. त्यानंतर तिला तिच्या आजीने सुभाषनगरातील घरी नेले. तेथेच तिची आत्या तिच्या परिवारासोबत राहते. आरोपी विजय नाहारकर हा पीडित मुलीच्या आत्याचा नवरा होय. तो सफाई कर्मचारी आहे. पीडित मुलीच्या आईच्या निधनानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईकडून हेळसांड होऊ नये म्हणून आजी-आजोबाने तिला आपल्या सुभाषनगरातील घरी ठेवून घेतले. गेल्या वर्षी ती सातवीत शिकायची. गेल्या वर्षी तिच्या वृद्ध आजीचे निधन झाले. त्यामुळे मुलीच्या पालनपोषणाचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी आजोबाने तिला तिच्या वडिलांच्या घरी राहायला पाठविले. सावत्र आईसोबत ती राहू लागली. महिनाभरापूर्वी अचानक मुलीचे पोट गर्भवती स्त्रीप्रमाणे दिसल्याने सावत्र आई आणि वडिलांनी तिला एका डॉक्टरकडे नेले. त्यांनी ती गर्भवती असल्याचे सांगून आता काही बाळंतपणाशिवाय पर्याय नसल्याचेही कळविले. त्यानंतर वडिलांनी तिला याबाबत विचारणा केली असता तिने आत्याचा नवरा आरोपी विजय नाहारकर याने मारहाण करून, धाक दाखवून वेळोवेळी तोंड काळे केल्याची माहिती सांगितली. काय करावे, या विवंचनेत असतानाच २० सप्टेंबरला मुलीला वेदना सुरू झाल्या. तिने एका रुग्णालयात मुलाला जन्म दिला.अवघी १४ वर्षांची मुलगी आई बनल्याचे नातेवाईकांना कळाल्याने चर्चेला उधाण आले. पंचायत बसली. त्यानंतर बराच विचारविमर्श केल्यानंतर आरोपी नाहारकरविरुद्ध तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी पीडित कुमारी माता आपले बाळ अन् आईवडिलांसह अन्य नातेवाईकांना घेऊन प्रतापनगर ठाण्यात पोहचली. तिची कैफियत ऐकून पोलिसही चक्रावले. ठाणेदार शिवाजीराव गायकवाड यांनी लगेच मुलीची वैद्यकीय तपासणी करवून घेतली. तिची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर आरोपीला पकडून आणण्यात आले. निर्दयतेचा कळसआरोपी नाहरकरला पीडित मुलीच्या वयाची दोन मुलं आहेत. सासू-सासरे आणि पत्नी तसेच मुले घराबाहेर जाताच तो पीडित बालिकेवर अत्याचार करायचा. तोंड काळे करतानाच तो मुलीच्या शरीरासह चेहºयावरही निर्दयपणेओरबडायचा. त्याच्या अत्याचारामुळे मुलीच्या चेह-यावर ओरबडल्याचे काळे डाग पडले आहेत. पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याने आपल्या पापाचा स्पष्ट इन्कार करून तो मी नव्हेच, अशी भूमिका घेतली होती. मुलीचा अन् तिच्या बालकाचाही प्रश्नअवघ्या १४ व्या वर्षी कुमारी माता बनलेल्या या दुर्दैवी बालिकेचा आणि तिच्या निष्पाप मुलाच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती बाल कल्याण समितीला कळविली आहे. मुलगी अन् नातवाचा सांभाळ करण्याची तयारी पीडित मुलीच्या वडिलांनी दाखविली आहे. मात्र, कायदेशीर तरतुदी तपासूनच तिला वडिलांच्या घरी पाठवायचे की सुधारगृहात, त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ठाणेदार गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा