शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

अल्पवयीन अपत्यांना वडील वाऱ्यावर सोडू शकत नाहीत, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:52 IST

पत्नीसोबतच्या भांडणामुळे वडील अल्पवयीन अपत्यांना वाºयावर सोडू शकत नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका मुस्लीम दाम्पत्याच्या प्रकरणात दिला आहे.

- राकेश घानोडे नागपूर : पत्नीसोबतच्या भांडणामुळे वडील अल्पवयीन अपत्यांना वाºयावर सोडू शकत नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका मुस्लीम दाम्पत्याच्या प्रकरणात दिला आहे.पती-पत्नीमधील संबंध अनेक कारणांनी बिघडू शकतात. त्या परिस्थितीत न्यायालयात जाऊन आपापले अधिकार मिळविण्याचा मार्ग त्यांना कायद्याने उपलब्ध करून दिला आहे. परंतु पत्नीसोबत भांडण असल्यामुळे मुलांचीही देखभाल नाकारणे हे वडिलांकडून अपेक्षित नाही. वडिलांकडून सांभाळ व्हावा, हा प्रत्येक मुलाचा स्वतंत्र अधिकार आहे. पालकांमधील भांडणामुळे त्यांचा हा अधिकार नाकारला जाऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी या निर्णयात म्हटले आहे.असे आहे प्रकरण : प्रकरणातील दाम्पत्याला आठ वर्षांची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा आहे. आपसात पटेनासे झाल्यानंतर पतीने पत्नीला मुलांसह घराबाहेर काढले. त्यानंतर पत्नीने पोटगी व घरभाड्यासाठी न्यायालयात धाव घेतली. कायद्यातील तरतुदींचा उपयोग करून तिने पोटगी व घरभाड्यापोटी एकूण नऊ हजार रुपये महिना खर्च मिळवून घेतला. त्यात मुलांच्याही पोटगीचा समावेश आहे. त्याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने प्रभावी निरीक्षणे नोंदवून हा अर्ज फेटाळून लावला.२५ हजारांचा दावा खर्च बसवला : पत्नी व अपत्यांवर एक पैसाही खर्च न करण्याची पतीची प्रवृत्ती पाहता न्यायालयाने त्याच्यावर २५ हजार रुपये दावा खर्च बसवला. पतीच्या या प्रवृत्तीमुळे पत्नी व अपत्यांना पोटगीसाठी प्रत्येक वेळी न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. प्रकरण प्रलंबित असताना पतीने पोटगीचे २ लाख ३० हजार रुपये थकवले. तसेच न्यायालयाचे ७० हजार रुपये जमा करण्याचे निर्देश असताना ६३ हजार रुपये त्याने जमा केले. या बाबी दावा खर्च बसवताना विचारात घेण्यात आल्या.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट