शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय जुलै महिन्यातच, राज्यमंत्री सतेज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 07:07 IST

Satej Patil : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.

मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, व्यक्तींना ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार’ देण्याचा निर्णय जुलै महिन्यातच घेण्यात आला होता. केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या आधीच त्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे या दोन्हींचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट करतानाच, राज्यात पाच विभागात हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती राज्याचे माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी दिली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुरस्कारांसाठी आयटी इंजिनियरिंग सर्व्हिस सॉफ्टवेअर, आयटी एनेबल्ड सर्व्हिस (बीपीओ/केपीओ), आयटी इंफ्रास्ट्रक्चर (डेटा सेंटर), मोस्ट प्रॉमिसिंग स्टार्टअप आणि स्पेशल अवॉर्ड फॉर कॉन्ट्रिब्युशन टू महाराष्ट्र असे पाच विभाग करण्यात आले आहेत. या पाच विभागात पुरस्कारांची निवड होणार असून मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार असल्याचे राज्यमंत्री पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

यावर्षीच्या पुरस्कारांचे  वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. आज २० तारखेला राजीव गांधी यांच्या जयंती दिनापासून नामांकनासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. १५ सप्टेंबर २०२१ ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असेल, तर २० ऑक्टोबरपर्यंत छाननी समितीच्या सर्व बैठका पार पडतील. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधी