शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली मृत शेतकरी कुटुंबाला भेट, रुग्णालयातील शेतक-यांचीही केली विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 18:01 IST

किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यु झालेल्या शेतक-याच्या कुटुंबाला कृषी व फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. आर्णी  तालुक्यातील शेंदुरसनी येथील दीपक मडावी यांचा गत महिन्यात विषबाधेमुळे मृत्यू झाला होता.

यवतमाळ - किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यु झालेल्या शेतक-याच्या कुटुंबाला कृषी व फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. आर्णी  तालुक्यातील शेंदुरसनी येथील दीपक मडावी यांचा गत महिन्यात विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मृतक दीपक मडावी यांचे वडील श्याम मडावी, दीपकची पत्नी आणि मुलगी वैष्णवीचे सांत्वन केले. यावेळी कृषी उपसंचालक पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, आत्माचे प्रकल्प संचालक दत्ता काळे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, कृषी विस्तार अधिकारी डी.आर.कळसाईत आदी उपस्थित होते.यावेळी राज्यमंत्री खोत यांनी श्याम मडावी यांच्याशी चर्चा केली. गावात कृषी विभागाचे अधिकारी येतात का. फवारणी करतांना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहायक तसेच औषधी विक्रेते व किटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी गावातील नागरिकांना मार्गदर्शन करतात का. गावात ग्रामसेवक किती दिवासांनी येतात. विषबाधा झाल्यानंतर दीपक किती दिवस दवाखान्यात भरती होते, याबाबत विचारणा केली. यावेळी श्याम मडावी यांनी सांगितले की, दीपक तीन दिवसांपासून फवारणी करत होता. बाहेर रोजंदारीवरसुध्दा फवारणीसाठीसुध्दा जात होता. दोन-तीन दिवसानंतर त्याची तब्बेत बिघडली आणि रुग्णालयात दाखल केले. पाच दिवसानंतर दीपकचा मृत्यू झाला.  घरी चार एकर शेती आहे. एक एकर त्याला मक्त्याने दिली होती. सातबारा माझ्याच नावावर आहे. कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आठवड्यातून एक-दोनदा येतात, असे श्याम मडावी यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री खोत यांनी दीपकच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश दिले. तसेच ग्रामसेवक, कृषी सहायक, मंडळ अधिकारी यांनी नियमित गावात येऊन नागरिकांना फवारणीसंदर्भात मार्गदर्शन करावे. ग्रामपंचायतीमध्ये याबाबत नोंदी अद्ययावत ठेवाव्यात आदी सुचना केल्या. राज्यमंत्री खोत यांनी दीपक मडावी ज्या शेतावर फवारणी करण्यासाठी गेले होते त्या शेतावर भेट दिली. तसेच लोणबेहळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. फवारणीबाधीत किती शेतकरी या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आले होते. त्यांना कुठे रेफर करण्यात आले, आदी बाबींची त्यांनी विचारपूस केली. राज्यमंत्र्यांची रुग्णालयाला भेट : राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन भरती असलेल्या विषबाधीत शेतक-यांची विचारपूस केली. त्यांच्या नातेवाईकांना यावेळी त्यांनी धीर दिला. या रुग्णांच्या वैद्यकीय खर्चासाठी त्वरीत तरतूद करावी, असे निर्देश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. राठोड, मेडीसीन विभगाचे डॉ. येलके आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत FarmerशेतकरीAmravatiअमरावती