शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

...तर ५०० एकर जमीन तुला देईन; मंत्री संदीपान भुमरे अन् चंद्रकांत खैरेंमध्ये खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 19:38 IST

बिनबुडाचे आरोप करायचे, समोरच्यांना बदनाम करायचा हा खैरेंचा धंदा आहे. याची टीम त्यांच्याकडे आहे असा पलटवार मंत्री भूमरे यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर - विनाकारण शिंतोडे उडवण्याचे काम चंद्रकांत खैरेंनी करू नये. जिल्ह्याची वाट खैरेंनी लावली. एखादे काम दाखवा जे खैरेंनी केले आहे. माझ्याकडे ७०० एकर जमीन आहे बोलता, सिद्ध करून दाखवा त्यातील २०० एकर मला राहू द्या, ५०० एकर तुला घे, हा माझा शब्द आहे. सातबारा काढा, ५०० एकर जमीन तुझ्या नावावर करेन, काहीही आरोप करायचे? असं आव्हान मंत्री संदीपान भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरेंना दिले. 

मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, माझी वडिलोपार्जित किती जमीन होती त्याचे सातबारा काढू, परंतु चंद्रकांत खैरे यांचा व्यवसाय काय होता. पण इतका पैसा, संपत्ती कुठून आली? ज्याने त्याने व्यवसाय करावा, इतरांबद्दल बोलू नये. खैरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पक्षाच्या कार्यक्रमात संजय राऊतांनी झापलं, गॅलरीत कोणी नव्हते. समोरच कोणी नाही तर गॅलरीत कोण राहतील. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते खैरेंना विचारत नाही. त्यांचा राग आमच्यावर कशाला काढता? खैरेंनी कुणाच्या संपत्तीचे काढू नये. आम्ही चोऱ्या केल्या नाहीत असं त्यांनी सांगितले. 

तसेच आजही माझे आणि माझ्या वडिलांचा सातबारा दाखवतो, राजकारणात यायच्या आधी आमच्याकडे बागायती जमीन होती आणि कोरडवाहू जमीन होती. माझ्याकडे शेकडो एकर जमीन आहे असं सातत्याने खैरे सांगतात. चंद्रकांत खैरेंचे संतुलन बिघडले आहे. खैरेंनी निवडून यावे. स्वत: निवडून ये मग दुसऱ्याला निवडून आणण्याची भाषा करावी. छत्रपती संभाजीनगरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवारच निवडून येणार आहे. खैरेंना काही काम नाही. त्यांना त्यांच्या पक्षातच कोणी विचारत नाही. त्यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही असंही मंत्री भूमरे म्हणाले. चंद्रकांत खैरेंचा टक्केवारीचा धंदाबिनबुडाचे आरोप करायचे, समोरच्यांना बदनाम करायचा हा खैरेंचा धंदा आहे. याची टीम त्यांच्याकडे आहे. आम्ही रस्ते दिले, पाणी दिले, ही विकासकामे केली हे सांगू शकत नाही. २० वर्ष चंद्रकांत खैरेंनी काय केले? खैरेंनी माझ्यावर अनेक आरोप केले, पण टक्केवारीचा धंदा खैरेंचा आहे. हा धंदा गेल्या ५ वर्षापासून बंद झालाय. त्यामुळे ही टक्केवारी त्यांना आठवतेय. कन्नडला काम न करता पैसे लाटले. कित्येक ठिकाणी कामे न करता निधी लाटला. त्यामुळेच खैरेंना पराभव सहन करावा लागला असा घणाघात मंत्री भूमरे यांनी खैरेंवर केला. 

'त्या' बातम्या निराधारमंत्रिमंडळातील ५ जणांना डच्चू देणार या बातम्या विरोधकांनी पेरलेल्या आहेत. याबाबत कुठेही चर्चा नाही. मला आस्थापना नाही, अधिकारी नाही मग मी बदली कशी करणार? विनाकारण कुणाकडून ऐकायचे आणि बातम्या पेरायचे. आमची नाराजी नाही. रोजगार हमीचे नाव आम्ही नावारुपाला आणले. हे खाते शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे आहे. मंत्रिमंडळातून डच्चू देण्याच्या बातमीला काहीच अर्थ नाही. भाजपाचा निरोप कुणी ऐकला? माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत. ज्यावेळी विस्तार व्हायचा असतो तेव्हा बातम्या पेरल्या जातात असा दावा मंत्री भूमरे यांनी केला. 

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेSandipan Bhumreसंदीपान भुमरे