शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ‘त्या’ वक्तव्याने वाद; विरोधकांकडून टीका; भाजपची सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 06:15 IST

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबई हिंदी पत्रकार संघाने शुक्रवारी वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात सरनाईक म्हणाले की, त्यांचा मतदारसंघ ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्ये येतो. ठाण्यात ते मराठी  बोलतात, पण मीरा-भाईंदरमध्ये त्यांच्या तोंडून हिंदी भाषा निघते. मराठी आमची आई आहे, तर हिंदी लाडकी बहीण आहे, असेही ते म्हणाले.

‘राज्यात कठपुतळीचा खेळ’

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले की, सरनाईक हे भाजपचे धोरण राबवत आहेत. त्यांना मराठी संपवून हिंदी, हिंदू राष्ट्र करायचे आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात सगळ्यात आधी काँग्रेसने आवाज उठवला, त्यानंतर अन्य पक्षांनी भूमिका घेतली, असा दावा करत सपकाळ पुढे म्हणाले की, अमित शाह हेच राज्याचे खरे मुख्यमंत्री असून राज्यात कठपुतळीचा खेळ सुरू आहे.   

‘हा विचार भाजपचा’

उद्धव सेनेचे खा. संजय राऊत सरनाईकांवर टीका करताना म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. हे लोक म्हणतात की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहोत. त्यामुळे त्यांच्या नेत्यांना विचारा की, त्यांचीही हीच भूमिका आहे का? हा विचार भाजपचा, अमित शाह यांचा आहे, असे राऊत म्हणाले.

प्रताप सरनाईक यांच्यासारखे लोक  मतांसाठी मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य गहाण ठेवतील. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  विनंती आहे की, तुमच्या अशा बेताल लोकांना आवर घाला.- यशवंत किल्लेदार, उपाध्यक्ष, मनसेसरनाईक यांच्यासमोर हिंदी वर्ग बसला असेल, त्यामुळे ते हिंदीबाबत बोलले असतील. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्याने सरनाईक मराठीच्या विरोधात आहेत, असे मानण्याचे काही कारण नाही.- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक