शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"प्रिय अण्णा, त्यावर बोलाल या आशेसह...", अण्णा हजारेंना जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 12:37 IST

Jitendra Awhad on Anna Hazare: भारतीय सैन्य दलात भरतीसाठी केंद्र सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे. त्यावरुन आता विरोधकांनी केंद्राला धारेवर धरले आहे.

मुंबई: आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अण्णा हजारेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. 

अण्णा हजारेंना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण शुभेच्छा देत आहेत. पण, गेल्यावर्षीही खोचक शब्दांत शुभेच्छा देणाऱ्या आव्हाड यांनी यंदाही अण्णांना तशाच शुभेच्य़ा दिल्या आहेत. गेल्यावेळी चीनच्या विषयात लक्ष घालावे म्हणून तर यावेळी लष्करातील कंत्राटी भरतीवर बोलावं, अशी अपेक्षा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात की, "प्रिय अण्णा, आपण लष्करातील माजी सैनिक आहात. त्यामुळे भयंकर महागाई, वाढती बेरोजगारी, सामाजिक तेढ, ढासळती आर्थिक पत यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत. त्यावर तरी किमान वाढदिवसाच्या निमित्ताने बोलाल याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा," अशा शुभेच्छा आव्हाडांनी दिल्या आहेत.

केंद्र सरकारची नवीन योजनाया शुभेच्छांमधून जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या भारतीय सैन्य दलातील नवीन भरती प्रक्रियेवर टीका केली आहे. केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे. भारतीय सैन्यदलांत तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. या अग्निपथ योजनेत चार वर्षांची सेवा आणि त्यानंतर सेवानिवृत्ती मिळेल. यावरुन आता विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड