शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत अनेक नक्षलवादी मारले गेलेत, आम्ही बदला घेऊ; एकनाथ शिंदेंना धमकीचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:02 IST

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याची धमकी; भामरागढ एरिया कमिटीचं पत्र

ठाणे: ठाणे तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीने ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पालकमंत्री शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीच्या नावाने आलेल्या या पत्रात 'तुम्ही गडचिरोलीचा खूप विकास करत आहात. पण आम्हाला मोठी समस्या निर्माण करत आहात. पोलिसांच्या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. याचा आम्ही नक्कीच बदला घेऊ,' अशा धमकीचे पत्र ठाण्यातील लुईसवाडीतील नंदनवन या शिंदे यांच्या निवासस्थानी आठ दिवसांपूर्वी आल्याची माहिती सुत्रांनी दिली. गडचिरोली पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.एकनाथ शिंदे हे ठाण्याप्रमाणेच गडचिरोलीचेदेखील पालकमंत्री आहेत. गेल्या काही महिन्यात त्यांनी गडचिरोली येथे विकासकामांचा धडाका लावला. त्याचप्रमाणे अनेक नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे गडचिरोली आणि आसपासच्या जिल्ह्यातील नक्षलवादी नाराज असल्याचे सुत्रांनी सांगितले. याच नाराजीतून त्यांना हे पत्र आल्याचे बोलले जात आहे.    हे धमकीचे पत्र मुंबईतील त्यांच्या शासकीय बंगल्यावरही पाठवण्यात आले होते. त्या संदर्भात मुंबईतील पोलिस तपास करत असून ठाण्यातदेखील हे पत्र कोणी पाठवले या संदर्भात तपास सुरू असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. या पत्रावाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता, यावर नंतर प्रतिक्रिया देईन, असे सांगत ते कोल्हापूर दौऱ्याला निघून गेले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली