शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांनाच कुणबी व्हायचंय, राज्यात मराठा राहणार की नाही?; छगन भुजबळांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 23:14 IST

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

Chhagan Bhujbal On Manoj Jarange :मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे हे ओबीसीतून आरक्षण घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे या मागणीला ओबीसी नेत्यांसह समाजाकडूनही कडाडून विरोध केला जातोय. अशातच ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणं शक्य नाही. मराठ्यांनी वेगळं आरक्षण घ्यावं, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे.  मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलीय. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांचा मुद्दा उपस्थित केल्यान राज्य सरकारनेही अद्याप त्यांच्या मागणीबाबत ठोस असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना इशारा दिला आहे. विधानसभेला २८८ पैकी आठ उमेदवार निवडून आणून दाखवा असं आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं आहे. सांगलीतल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ बोलत होते.

"मनोज जरांगे अनेकवेळा म्हणाले की, मराठा समजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर आम्ही २८८ उमेदवार उभे करणार आहोत. आहो आधी ८८ उमेदवार तर उभे करा आणि त्या उमेदवारामधून फक्त ८ उमेदवारच निवडून आणा. निवडणुकीच्या मैदानात या आणि निवडणुका लढवा. माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभेच करुन दाखवा, असं छगन भुजबळ म्हणाले. "ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही म्हणजे नाही. न्यायालयाने देखील असचं म्हटल आहे.  आधी ओबीसी आरक्षणाचा बॅकलॉग भरा मग बाकीच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा. ओबीसीला धक्का लावून आरक्षण देणार नाही असं सर्वांनीच म्हंटले आहे. तरी देखील आम्हाला टार्गेट करण्याचे कारण काय? तुम्हाला आरक्षण पाहिजे, कायद्याने जे काही असेल ते घ्या. आम्ही वेगळे काही मागितले नाही. सर्वांनीच कुणबी व्हायचं आहे, तर महाराष्ट्र मध्ये मराठा राहणार का नाही?," असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. 

"राज्यात महायुतीच सरकार आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाहीच. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही. मनोज जरांगेंना यांना सांगा की मराठा समाजाला ओबीसीमधून कदापी आरक्षण मिळणार नाही," असंही छगन भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळOBCअन्य मागासवर्गीय जाती