शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

MIM-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती होणार?; खा. इम्तियाज जलील म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 15:12 IST

एमआयएमला फायदा मिळेल, नाही मिळणार ही वेगळी गोष्ट आहे. शिवसेनेबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे असं इम्तियाज जलील म्हणाले.

औरंगाबाद -  महाराष्ट्रानं कधीही इतके घाणेरडे राजकारण पाहिलं नाही. राजकारण काहीही असो. शिवसेनेसोबत मतभेद असतील. परंतु मराठी अस्मिता शिवसेनेशी जोडलेली होती. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ते दुर्देवी आहे. अमित शाह आणि मंडळींनी मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचं काम केले. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्याशी देणेघेणे नाही. जे कुणाला जमलं नाही ते अमित शाह यांनी मराठी माणसांना कमकुवत करण्याचं पाप केले आहे अशा शब्दात एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपावर निशाणा साधला. 

इम्तियाज जलील म्हणाले की, एमआयएमला फायदा मिळेल, नाही मिळणार ही वेगळी गोष्ट आहे. शिवसेनेबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे. राजकीय मतभेद असतील. मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना उभी राहिली. मीदेखील मराठी माणूस आहे. मराठी लोकांवर कुठे काही झाले तर आपल्यासाठी कुणी उभे आहे या भावनेतून शिवसेना उभी राहिली. शिवसेनेचं धार्मिक रंग वेगळी बाजू आहे. शिवसेना फोडल्यानंतर काहीतरी चेंज झाल्याचं दिसून येते. सत्ता लागण्यासाठी जे कुणी येतील त्यांचे स्वागत असेल अशी भूमिका आहे. मुस्लीम मते राजकारणात टिकण्यासाठी गरजेची पडली. मुस्लीम सॉफ्ट टार्गेट होते आता ते राहणार नाही असं त्यांनी सांगितले. MIM-शिवसेना युती होणार?तसेच शिवसेना हिंदुत्वाच्या आधारावर उभी राहिली आहे. कुणाच्या मनात MIM-शिवसेना एकत्र येतील असं वाटत असेल तर ते शक्य नाही. शिवसेना कुणासोबत जाऊ शकते पण आमच्यासोबत नाही. MIM ची विचारधारा वेगळी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला मुस्लिमांची मते हवीत. नेतृत्व नको. मुस्लिमांनी मतदान करायचे पण नेते नको. त्यांना नेतृत्व नकोय. आम्ही राजकीय प्रवाहात आलो तेव्हा आम्ही नेतृत्व का करू शकत नाही असं लोकांमध्ये सांगितले. आमचे खासदार, आमदार होऊ शकतात हे दाखवून दिले. तुम्ही आमच्यासोबत बसू शकत नाही अशी मानसिकता इतर राजकीय पक्षात होती. ती MIM ने खोडून काढली अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे