शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

राज्यात नवं समीकरण! MIM ची शरद पवारांना ऑफर; शिवसेनेची कोंडी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 10:33 IST

राज्यात शिवसेनेने मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेस –राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसायला लागलं

औरंगाबाद – राज्यात मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना यांच्यात दरी निर्माण झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ऐतिहासिक राजकीय घडामोडी घडल्या. भाजपाविरोधी पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देत राज्यात सत्ता मिळवली. अलीकडेच भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याने मविआचे २५ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. त्यातच दुसरीकडे ओवैसी यांच्या MIM नं महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची तयारी केली आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील(MIM Imtiaz Jalil) यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांच्यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपर्यंत(NCP Sharad Pawar)) निरोप पोहोचवा अशी विनंती केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने जलील यांनी केलेल्या राजकीय खेळीवर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं गरजेचे आहे. एमआयएमने काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडीची ऑफर दिली आहे. भाजपाला हरवायचं असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवं असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. ABP दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राज्यात शिवसेनेने मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेस –राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसायला लागलं. मात्र कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याने भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन शिवसेनेवर प्रहार करणं सुरू केले आहे. त्यात आता MIM जर महाविकास आघाडीसोबत गेली तर भाजपाला आयतं कोलीत सापडणार आहे. शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादाचा मुद्दा मुद्दा जलील यांना विचारताच भाजपाला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हणाले.

राज्यात येऊ घातलेल्या आगामी महापालिका निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, ठाणे यासारख्या महापालिकांचा समावेश आहे. त्यामुळे MIM नं महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी केली आहे. हा निरोप शरद पवारांपर्यंत पोहचवण्याची विनंती जलील यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना केली आहे. जलील म्हणाले की, MIM मुळे भाजपा जिंकते असा आरोप आमच्यावर केला जातो. मग आम्ही ऑफर देतो हे एकदा संपवायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करणार का? त्यावर ते काहीही बोलत नाहीत. नुसते आरोप करू नका भूमिका सिद्ध करा असं आव्हान जलील यांनी दिलं आहे.

शिवसेनेची भूमिका

इम्तियाज जलील यांच्या ऑफरवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,  राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. चौथा, पाचवा कोण असेल याची आतापासूनच चर्चा करण्याची गरज नाही. जे भाजपासोबत छुप्या युतीत काम करत आहेत, त्यांच्याशी महाविकास आघाडीत संबंध येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जे औरंगजेबाला मानतात त्यांचा शिवरायांना मानणाऱ्यांशी कोणताही संबंध येत नाही. एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे. सर्व राज्यांत आपण हे पाहिलेले आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणाऱ्यांसोबत आमची आघाडी कशी होईल, हे तुम्ही कसा विचार करू शकता. त्यांना दूरुनच नमस्कार असं सांगत शिवसेनेने MIM सोबत आघाडी करण्यास नकार दिला आहे.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारImtiaz Jalilइम्तियाज जलील